Dr. Valsangkar Death Case Saam Tv
महाराष्ट्र

Dr. Shirish Valsangkar: डॉ. वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण, आरोपी मनिषा मानेच्या खात्यात ३९ लाख रुपये, कुणी दिले पैसे?

Dr. Valsangkar Death Case Update: डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी अटकेत असलेली आरोपी मनिषा मानेच्या बँक खात्यामध्ये ३९ लाख रुपये असल्याची माहिती पोलिसांनी आज न्यायालयात दिली.

Priya More

विश्वभूषण लिमये, सोलापूर

सोलापूरमधील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येनंतर सोलापूरमध्ये खळबळ उडाली. या आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण लागले आहे. डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात नवनवीन खुलासे होते आहेत. या प्रकरणी मनीषा माने अटकेत असून तिला आज न्यायालयात हजर करण्यात आले होते.

शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणात नवीन धक्कादायक माहिती समोर आली आहे. आरोपी मनिषा मानेच्या बँक खात्यामध्ये पगाराव्यतिरिक्त ३९ लाख रुपये असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी आज न्यायालयात ही माहिती दिली. हे पैसे कुठून आले याचा तपास सध्या सोलापूर पोलिस करत आहेत.

शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील आरोपी मनीषा मुसळे मानेच्या पोलिस कोठडीमध्ये पुन्हा एकदा २ दिवसांची वाढ करण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपी मनीषा मानेची पोलिस कोठडी मिळावी यासाठी तिला आज न्यायालयात आणण्यात आलं होतं. यावेळी आरोपी आणि सरकारी पक्षाचा युक्तिवाद ऐकल्यानंतर सोलापूर सत्र न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी मंजूर केली आहे.

यावेळी पोलिसांनी न्यायालयात आरोपी मनीषा मानेविरोधात विविध नवीन आरोप केले आहेत. यामध्ये प्रामुख्याने आर्थिक गैरव्यवहार संबंधने आरोप करण्यात आले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी ४२ साक्षीदार तपासले. आतापर्यंत झालेल्या तपासात डॉ. वळसंगकर यांच्या एसपी न्युरोसायन्स हॉस्पिटलमध्ये आरोपी मनीषा मानेने मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप केला आहे.

मनीषा मानेचे बँकेत ३ खाते असून या खात्यातील जवळपास ७० लाख रुपयांचे कोणतेही कर भरले नाही तर पगाराव्यतिरिक्त ३९ लाख रुपये खात्यामध्ये कुठून आले याचा पुरावा नसल्याचा युक्तीवाद पोलिसांनी न्यायालयात केला आहे. तसंच, आरोपी मनीषा मानेने हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांना रोख रक्कम देऊन बँकेत पैसे ट्रान्सफर करून घेतल्याचा दावा पोलिसांनी न्यायालयात केला आहे.

दरम्यान, ‘मनीषा मानेवर मयत डॉ. शिरीष वळसंगकर किंवा फिर्यादी डॉ. अश्विन वळसंगकर यांनी कोणत्याही पद्धतीने आर्थिक गैरव्यवहर केल्याचा आरोप केलेला नाही. जामीन अर्जाला विरोध करण्यासाठी पोलिसांनी जुनेच कारण पुढे आणल्याचा दावा आरोपी मनीषा मानेचे वकील प्रशांत नवगिरेंनी न्यायालयामध्ये केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Archery World Championships: सुवर्ण कामगिरी; भारताच्या तिरंदाजांनी इतिहास रचला

Nagpur: दारूबंदी असतानाही विक्री; एकाला अवैध दारूसाठ्यासह अटक

दहिसरमध्ये भीषण आग, अग्निशमन दल घटनास्थळी, पाहा व्हिडिओ

Instant Face Pack: अर्ध्या तासात येईल चेहऱ्यावर ग्लो, वापरा हा घरात तयार केलेला फेसपॅक

SBI Clerk 2025 : SBI बँकेत नोकरीची सुवर्णसंधी! क्लर्क पदासाठी मोठी भरती, ६५८९ रिक्त जागा

SCROLL FOR NEXT