राहुरी कृषी विद्यापीठ 
महाराष्ट्र

कृषी विद्यापीठाची कमान नव्या अधिकाऱ्यांवर

साम टीव्ही न्यूज नेटवर्क

अहमदनगर : महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या कुलसचिवपदी कृषी विभागाचे प्रमोद लहाळे तसेच नियंत्रकपदी सुखदेव बलमे यांनी नुकताच पदभार स्वीकारला आहे. यापूर्वी नियंत्रक विजय कोते यांची बदली झाल्यामुळे व रिक्त असलेल्या कुलसचिवपदी नवे अधिकारी रूजू झाले आहेत. विद्यापीठाचे कार्यपद्धती व शासन स्तरावर समन्वय साधण्यासाठी शासनाच्या या दोन अधिकाऱ्यांची मोठी भूमिका असते.

दहा जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रामध्ये शेतकऱ्यांसाठी व विद्यार्थ्यांसाठी कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार कार्याची भूमिका, महात्मा फुले कृषी विद्यापीठासह अनेक संशोधन केंद्रे, विभागीय विस्तार केंद्रे कार्यरत आहेत. शासकीय व खासगी महाविद्यालयांमध्ये विद्यापीठाची खालावलेली कामगिरी, घसरलेले मानांकन, पन्नास टक्क्यापेक्षा जास्त रिक्त जागा, शास्त्रज्ञ, अधिकारी व कर्मचारी यांची कार्यक्षमता, त्यामध्ये पाच दिवसांचा आठवडा, विद्यापीठांच्या दहाही जिल्ह्यांमध्ये वाढलेले अतिक्रमण, विद्यापीठातील अंतर्गत राजकारण, सातव्या वेतन आयोगाबाबत अंमलबजावणी, वेतन देयकाबाबत प्राध्यापकांचे प्रलंबित विषय, कोविड पार्श्वभूमीवर शासनाकडून कमी येणारा निधी, विद्यापीठामध्ये वाढलेले कंत्राटीकरण अशा अनेक समस्यांना सामोरे जावून कृषी विद्यापीठ कसे पुढे नेता येईल व मागील काही वर्षांमध्ये खालावलेली कामगिरी कशी सुधारता येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'तेरी गाड़ी को हम ब्लास्ट करेंगे! सनातन संघाच्या राष्ट्रीय अध्यक्षांना बॉम्बने उडवण्याची धमकी

शरद पवारांना पत्र लिहिणारा अकोल्यातील तरूण समोर.. तो म्हणतो, साहेबच माझं लग्न करून देतील|VIDEO

Bigg Boss 19: मृदुल तिवारीला बाहेर काढण्यासाठी रचला कट; बिग बॉस १९ मध्ये प्रेक्षक म्हणून प्रवेश आलेल्या व्यक्तीचा दावा

दिल्ली बॉम्बस्फोटानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; ५०० ठिकाणी छापे अन् ६०० जणांना ताब्यात घेतलं

Girja Oak Husband: रातोरात स्टार झालेल्या गिरीजा ओकचा नवरा कोण आहे? काय करतो?

SCROLL FOR NEXT