Sunil Tatkare statement on Raigad district division latest news saam tv
महाराष्ट्र

राज्यातील जिल्ह्यांची संख्या वाढणार, कोणता बनणार नवा जिल्हा? सुनिल तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण

Maharashtra District Reorganisation: रायगड जिल्ह्याच्या विभाजनाबाबत खासदार सुनील तटकरे यांनी माणगाव येथे महत्त्वाचे विधान केले. नवीन जिल्हा झाल्यास माणगावला मुख्यालय करण्याचा शब्द त्यांनी दिला. तटकरे हे एका कार्यक्रमात बोलत होते. त्यावेळी त्यांनी जिल्हा बनण्याबाबत विधान केलंय.

Bharat Jadhav

रायगड जिल्ह्याच्या विभाजनाची चर्चा पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. रायगड जिल्हा फुटून नवीन जिल्हा तयार होणार असल्याचे संकेत खासदार सुनील तटकरे यांनी दिले आहेत. माणगाव येथील पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना खासदार सुनील तटकरे यांनी माणगाव नवा जिल्हा होईल असे विधान केलंय. विशेष म्हणजे, नवीन जिल्हा निर्माण झाल्यास त्याचे मुख्यालय माणगाव येथेच करण्याचा शब्दही त्यांनी माणगावकरांना दिला आहे.

त्यामुळे रायगड जिल्ह्याचे विभाजन होणार का आणि माणगाव नव्या जिल्ह्याचे मुख्यालय बनणार का, याबाबत राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रायगड जिल्ह्याच्या विभाजनाची मागणी आणि चर्चा सुरू आहे. जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार, प्रशासकीय कामकाज आणि नागरिकांची सोय लक्षात घेता जिल्ह्याचे विभाजन करण्याचा मुद्दा वेळोवेळी चर्चेत आला आहे.

आता खासदार सुनील तटकरे यांच्या विधानामुळे या चर्चेला पुन्हा एकदा बळ मिळालंय. माणगाव येथे बोलताना तटकरे यांनी नवीन जिल्हा तयार झाल्यास त्याचे मुख्यालय माणगाव येथे करण्याचा शब्द स्थानिक नागरिकांना दिला. त्यामुळे माणगावला जिल्ह्याचा दर्जा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, जिल्हा विभाजनाबाबत राज्य सरकारकडून अधिकृत निर्णय अजून कुठे झाला नाहीये.

दरम्यान, रायगड जिल्ह्याचे विभाजन झाल्यास राज्यातील जिल्ह्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे रायगडचे विभाजन नेमके कधी होणार? नवीन जिल्ह्यात कोणत्या तालुक्यांचा समावेश होणार? माणगाव हेच मुख्यालय होणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

यावेळी बोलताना सुनील तटकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केलीय. आपले राजकीय विरोधक नेहमी आपले नाव घेऊन माध्यमांसमोर येतात. त्यामुळे ते ब्रेकिंग न्युजमध्ये राहतात. त्यामुळे त्यांना टीआरपी मिळतो. परंतु आपण अशी विधानं कधी केली नाही, टीआरपीसाठी असे उद्गगार काढत नाही असं तटकरे म्हणालेत. परंतु विरोधकांना माझं नाव घ्यावं लागतं, असेही सुनील तटकरे म्हणाले असतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

BJP vs Congress:'सत्तेच्या भुकेपोटी भारताची बदनामी करू नका'; भाजप प्रदेशाध्यक्षांचं राहुल गांधींना प्रत्युत्तर

Konkan Alphonso Mango GI Tag Row: कोकणचा हापूस चोरण्याचा गुजरातचा डाव; 'हापूस'च्या जीआय मानांकनावरून वाद पेटला

'12 लाखांपर्यंतचा टॅक्स माफ केला, तुम्ही पगार वाढवला का?' पंतप्रधानांकडून उद्योगपतींची कानउघडणी

Saturday Horoscope: शनिवारी ग्रहांची मोठी कृपा! या राशींना मिळणार मेहनतीचे फळ, तर काहींना घ्यावी लागणार काळजी

10 लाख द्या तरच तक्रार मागे घेतो! स्पर्धा परीक्षा क्लास चालकांना खंडणीचा फोन; पुण्यात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT