Sangli Crime News  Saam TV
महाराष्ट्र

Sangli : सांगलीत एक दिवसाच्या बाळाचं झालं अपहरण; पाेलिस तपास सुरु

या घटनेमुळं रुग्णालयासह शहरात खळबळ उडाली आहे.

विजय पाटील

सांगली : सांगली (Sangli) तासगावमध्ये (tasgoan) नर्स (nurse) असल्याचे भासवून एका महिलेने एका रुग्णालयातून एक दिवसाच्या चिमुरड्याचं अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आज (रविवार) सकाळी आठ वाजता ही घटना घडली. हा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. याप्रकरणी सबंधित महिलेचा पोलिस शोध घेताहेत. (sangli latest marathi news)

तासगाव येथील सिध्देश्वर चौकातील एका दवाखान्यात एक महिला प्रसूत झाली. आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एक महिला नर्स असल्याचे भासवून सबंधितांच्या वार्डमध्ये गेली.

तेथून एक दिवसाच्या बालकाला घेऊन आपल्या काखेतील बॅगमध्ये टाकले. या बालकाला घेऊन महिलेने क्षणार्धात पलायन केले. या घटनेने रुग्णालयासह शहरात खळबळ उडाली आहे. ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. संबंधित महिलेचा पोलीस शोध घेत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: फडणवीसांची शिष्टाई यशस्वी, भाजपचे बंडखोर प्रा. अनिल सोले यांची अखेर माघार

नायट्रोजन बॉम्बसारखी पसरली आग! मुंबईत १४ मजली इमारतीचा थरार; २ महिलांचा होरपळून मृत्यू, ४० जणांना वाचवले

Boat Accident: सरकारी नाव उलटून १३ चिमुकल्यांचा करुण अंत, पीएम मोदींकडून दुःख व्यक्त; ६ लाखांच्या मदतीची घोषणा

Wednesday Horoscope : मोठी संधी मिळेल; 5 राशींच्या व्यक्तींचे भाग्य उजळणार, वाचा बुधवारचे राशीभविष्य

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT