Dattatray Bharane Saam TV News Marathi
महाराष्ट्र

Agriculture Minister Controversy : २४ तासांच्या आत नव्या कृषिमंत्र्यांचे वादग्रस्त विधान, कोकाटेंची कमतरता भरणेंनी भरली | VIDEO

Dattatray Bharane : "सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात त्यांचीच माणसं नोंद ठेवतात." असे विधान भरणे यांनी केलेय. इंदापूर येथील महसूल दिनाच्या कार्यक्रमात हे विधान करण्यात आले.

Namdeo Kumbhar

  • नव्या कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे वक्तव्य इंदापूरमध्ये वादाचा विषय ठरले

  • “वाकडं काम केल्यावर माणसं लक्षात ठेवतात” असं अजब विधान

  • महसूल दिनाच्या कार्यक्रमात अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना केलेली मांडणी

  • पारदर्शकतेच्या अपेक्षांच्या पार्श्वभूमीवर हे विधान अडचणीचे

  • स्थानिक पातळीवर राजकीय व प्रशासकीय चर्चेला उधाण

Maharashtra Agriculture Minister Dattatray Bharane : माणिकराव कोकाटे यांची कमतरता नवीन कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अवघ्या २४ तासात भरून काढली आहे. कृषिमंत्रिपदाचा कारभार हातात घेताच २४ तासांच्या आत भरणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. एकादं काम वाकडं करून परत सरळ करता येते. वाकडं काम करतात, त्यांचीच नोंद माणसं ठेवतात, असे वक्तव्य दत्ता भरणे यांनी केलेय. कृषिमंत्री दत्ता भरणे यांचा हा अजब सल्ला इंदापूरमध्ये चर्चेत आहे.

राज्याचे नवे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे वादग्रस्त विधानाने अडचणीत येण्याची शक्यता आहे. महसूल दिनानिमित्त इंदापूर येथे केलेल्या भाषणात एक अजब आणि वादग्रस्त विधान करून उपस्थितांचे कान टवकारले. महसूल अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी म्हटले की, “सरळ काम सगळेच करतात, पण एखादं काम वाकडं करून परत सरळ करतात त्याची माणसं नोंद ठेवतात.” या विधानाने कार्यक्रमाला उपस्थित अधिकाऱ्यांमध्ये क्षणभर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

महसूल दिनासारख्या गंभीर प्रसंगी कृषिमंत्र्यांकडून अशी मांडणी होणे, हे अनेकांना पचनी पडले नसावे. महसूल विभागाकडून पारदर्शकता आणि प्रामाणिक सेवा अपेक्षित असताना, मंत्र्यांनी “काम वाकडं करून परत सरळ करण्याचा” सल्ला दिल्याने प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.   भरणे यांनी पुढे शेतकऱ्यांच्या तक्रारींना वेळीच न्याय मिळावा आणि योजनांचा लाभ योग्य हक्कदारांपर्यंत पोहोचावा, असेही सांगितले. मात्र त्यांच्या अजब विधानामुळे मंत्री महोदय अडचणी येण्याची शक्यता आहे. स्थानिक पातळीवर या वक्तव्याची जोरदार चर्चा रंगणार असून , कृषिमंत्री पदाची जबाबदारी नुकतीच स्वीकारलेल्या भरणे यांनी अशा स्वरूपाचे मार्गदर्शन करणे कितपत योग्य? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News: कुणी नवं घर देतं का घर...आमदाराचा हस्तक्षेप अन् म्हाडाचा अनागोंदी कारभार, ८०३ कुटुंबियांच्या घराचं स्वप्न बेचिराख

Maharashtra Live News Update: नागपुरात शेतकऱ्यांच्या सरकारच्या विरोधात घोषणा

सातारा डॉक्टर आत्महत्या प्रकरणात मोठी अपडेट; अखेर आरोपी PSI बदनेचा मोबाईल सापडला, कुठं लपवला होता?

Cabbage Cutlet Recipe : गरमागरम चहा अन् कुरकुरीत कोबीचे कटलेट, संध्याकाळच्या नाश्त्याचा चमचमीत बेत

Pune Tourism : कॅम्पिंग, ट्रेकिंगसाठी पुण्यातील ऐतिहासिक ठिकाण, येथून दिसतो निसर्गाचा अद्भुत नजारा

SCROLL FOR NEXT