MPSC Exam 2024 yandex
महाराष्ट्र

MPSC Exam 2024 : एमपीएससीतर्फे १ डिसेंबरला होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी नवे प्रवेश प्रमाणपत्र अनिवार्य, प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध

Maharashtra Public Service Communication: 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी उमेदवाराचे प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहे.

Dhanshri Shintre

1 डिसेंबर रोजी होणाऱ्या राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 साठी उमेदवाराचे प्रवेशपत्र ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आले आहे. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा यापूर्वी 25 ऑगस्ट रोजी घेतली जाणार होती.

परीक्षेसाठी उमेदवारांना प्रवेशपत्रे वितरित करण्यात आली होती. मात्र, 1 डिसेंबर रोजी होणाऱ्या परीक्षेला उमेदवारांना जुन्या प्रवेश प्रमाणपत्राच्या आधारे प्रवेश दिला जाणार नाही. उमेदवारांनी नव्याने उपलब्ध करून देण्यात आलेले प्रवेशपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे.

एमपीएससीने याबाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले. परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान दीड तास आधी संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे, तसेच प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी एक तास आधी परीक्षा कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे. त्याशिवाय परीक्षेस प्रवेश दिला जाणार नाही. तसेच परीक्षेवेळी उमेदवारांनी एमपीएससीच्या मार्गदर्शक सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे.

निश्चित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही अथवा या संदर्भात एमपीएससीची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे. एमपीएससीकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर एमपीएससीच्या स्वेच्छाधिकारानुसार ठराविक कालावधीसाठी किंवा कायमस्वरुपी प्रतिरोधनाची, प्रचलित नियमातील तरतुदीनुसार कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडकीच्या पैशांवर भावांचा डल्ला, 14 हजार भावांनी लाटले तब्बल 21 कोटी

Maharashtra Politics : धनंजय मुंडे पुन्हा मंत्रीपदी? अजित पवारांनी दिले संकेत, नेमकं काय म्हणाले? VIDEO

Maharashtra Live News Update: दहशतवाद्यांना मातीत गाडण्यासाठी 'मेक इन इंडिया'ची मोठी भूमिका - PM मोदी

Rohit Pawar: धाराशिवमध्ये तयार होणारा हा तिसरा आका कोण? या आकाचा आका कोण? रोहित पवार यांचा सवाल

Wardha Rain : पावसाने केली दैना! घर कोसळलं, कुटुंबावर शौचालयात राहण्याची वेळ

SCROLL FOR NEXT