Dr Chandrashekhar Pakhmode Passes Away Saam Tv
महाराष्ट्र

Nagpur: प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचं ५० व्या वर्षी निधन, वैद्यकीय क्षेत्रात शोककळा

Dr Chandrashekhar Pakhmode Passes Away: नागपूरमधील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचं निधन झाले. वयाच्या ५० व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या निधनामुळे वैद्यकीय क्षेत्रात शोककळा पसरली आहे.

Priya More

Summary -

  • नागपूरमधील प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचे निधन

  • हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने वयाच्या ५० व्या वर्षी अखेरचा श्वास

  • २५ वर्षांचा प्रदीर्घ वैद्यकीय सेवाकाळ, हजारो रुग्णांना जीवनदान

  • वैद्यकीय क्षेत्रासह संपूर्ण नागपूर शहरात शोककळा

नागपुरातील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचं निधन झाले. त्यांच्या आकस्मित निधनामुळे नागपूरमधील वैद्यकीय क्षेत्रामध्ये शोककळा पसरली आहे. डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांचे ३१ डिसेंबरला पहाटे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ५० वर्षांचे होते. २५ वर्षांहून अधिक काळाच्या प्रदीर्घ सेवाकाळात त्यांनी अनेकांना जीवनदान दिले. त्यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

डॉ. चंद्रशेखर पाखमोडे नागपूरच्या धंतोली येथील न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये कार्यरत होते. बुधवारी पहाटे झोपेतच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना सीपीआर देण्यात आला आणि तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. नागपूरमधील वरिष्ठ हृदयरोगतज्ज्ञांनी त्यांच्यावर उपचार केले. त्यांनी पहाटे ४.३० वाजल्यापासून तात्काळ वैद्यकीय मदत पोहोचवली पण अनेक प्रयत्न करूनही डॉ. चंद्रशेखर यांचे प्राण वाचवण्यात यश आले नाही. अवघ्या ५० व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवल्यामुळे दु:ख व्यक्त केली जात आहे.

क्लिनिकल कौशल्य आणि रुग्णसेवेच्या वचनबद्धतेसाठी व्यापक आदर असलेले डॉ. पाखमोडे हे नागपूरमधील आघाडीच्या न्यूरोसर्जनपैकी एक मानले जात होते. गेल्या काही वर्षांत त्यांनी हजारो रुग्णांवर उपचार केले आणि त्यांचे प्राण वाचवले. मध्य भारतातील प्रगत न्यूरोलॉजिकल आणि न्यूरोसर्जरी सेवा मजबूत करण्यात डॉ. पाखमोडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यांच्या अचानक निधनामुळे सर्वांना मोठा धक्का बसला. डॉक्टर, रुग्ण आणि त्यांचे हिंतचिंतक सोशल मीडियावर पोस्ट करत शोक व्यक्त करत आहेत.

डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांच्या निधनानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत हळहळ व्यक्त केली. त्यांनी या पोस्टमध्ये लिहिले की, नागपूरमधील सुप्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांच्या निधनाचे वृत्त दु:खद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. २५ वर्षांहून अधिक काळ दिलेल्या आपल्या वैद्यकीय सेवेत डॉ. पाखमोडे यांनी असंख्य रुग्णांना नवजीवन दिले. वैद्यकीय क्षेत्रातील त्यांचे योगदान महत्वपूर्ण आहे. एक कुशल शल्यचिकित्सक असण्याबरोबरच अत्यंत शांत, सुस्वभावी आणि रुग्णांना आपुलकीने वागवणारे व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख होती. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती प्रदान करो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दु:खातून सावरण्याची शक्ती देवो.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: उल्हासनगरात शिंदेसेनेला मोठा धक्का; महिला पदाधिकाऱ्यांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'; हाती घेतलं कमळ

नाले स्वच्छ केलं की कचरा काढला, पाच वर्षात काय केलं; भाजपच्या माजी नगरसेवकाला नागरिकांनी घेरलं|VIDEO

Maharashtra Live News Update: चंद्रपूरमध्ये भाजपचे महानगर अध्यक्ष कासनगोट्टुवार यांना पदावरून हटवले

Bracelet Mangalsutra Designs: ब्रेसलेट मंगळसूत्राच्या या 5 लेटेस्ट डिझाईन्स, प्रत्येक महिलेच्या हातावर शोभून दिसतील

Toast Recipe : नाश्त्याला चहासोबत खाण्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत टोस्ट, वाचा सोपी रेसिपी

SCROLL FOR NEXT