NEET PG Exam Saam Tv
महाराष्ट्र

NEET PG 2025 : नीट पीजी २०२५ चा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहाल निकाल?

NEET PG Exam 2025 : NEET PG 2025 अखिल भारतीय 50% कोट्याची गुणवत्ता यादी NBEMS ने जाहीर केली आहे. स्कोअरकार्ड ५ सप्टेंबरपासून natboard.edu.in वर उपलब्ध होणार आहे.

Alisha Khedekar

  • NBEMS ने NEET PG 2025 अखिल भारतीय 50% कोट्याची गुणवत्ता यादी जाहीर केली.

  • स्कोअरकार्ड ५ सप्टेंबरपासून natboard.edu.in वर डाउनलोड करता येईल.

  • MCC च्या संकेतस्थळावर समुपदेशन तारखा व जागांची माहिती जाहीर होणार.

  • उमेदवारी अंतिम करण्यासाठी कागदपत्रे पडताळणी आवश्यक राहणार.

नॅशनल बोर्ड ऑफ एक्झामिनेशन्स इन मेडिकल सायन्सेस (NBEMS) ने अखेर पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी अखिल भारतीय ५० टक्के कोट्यातील जागांसाठी पात्र उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर केली आहे. हा निकाल २०२५-२६ शैक्षणिक सत्रासाठी एमडी, एमएस, पीजी डिप्लोमा, डीएनबी, डीआरएनबी (थेट सहा वर्षे) आणि एनबीईएमएस डिप्लोमा या अभ्यासक्रमांना लागू होणार आहे.

एनबीईएमएसने दिलेल्या माहितीनुसार, NEET PG 2025 ची परीक्षा ३ ऑगस्ट रोजी पार पडली होती आणि त्याचा निकाल १९ ऑगस्ट रोजी जाहीर झाला. या निकालानुसार, ज्या उमेदवारांनी सूचित किमान कट-ऑफ गुण प्राप्त केले आहेत तेच अखिल भारतीय ५० टक्के कोट्यातील प्रवेशासाठी पात्र ठरणार आहेत. आता या उमेदवारांसाठी गुणवत्ता यादी तयार करण्यात आली असून, पुढील प्रवेशप्रक्रियेसाठी ती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.

अखिल भारतीय ५० टक्के कोट्यात पात्र ठरलेल्या उमेदवारांचे गुणपत्रक (स्कोअरकार्ड) ५ सप्टेंबर २०२५ पासून NBEMS च्या अधिकृत संकेतस्थळावर natboard.edu.in उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे स्कोअरकार्ड सहा महिन्यांपर्यंत पाहता येईल, मात्र उमेदवारांना ते वैयक्तिकरित्या पाठवले जाणार नाही. या गुणपत्रकात एकूण NEET PG 2025 रँक, अखिल भारतीय ५० टक्के कोटा रँक तसेच ओबीसी, एससी, एसटी आणि ईडब्ल्यूएस अशा सर्व राखीव प्रवर्गांनुसार स्वतंत्र रँकची माहिती दिली जाईल. यामुळे उमेदवारांना समुपदेशन प्रक्रियेदरम्यान आपली स्थिती स्पष्टपणे कळणार आहे.

एनबीईएमएसने स्पष्ट केले आहे की या टप्प्यावर उमेदवारी तात्पुरती मानली जाईल आणि अंतिम प्रवेश फक्त समुपदेशन किंवा प्रत्यक्ष प्रवेशाच्या वेळी शैक्षणिक कागदपत्रांची व ओळखीची पडताळणी झाल्यानंतरच निश्चित होईल. अर्जात जर कोणतीही चुकीची किंवा दिशाभूल करणारी माहिती आढळली आणि ती माहिती रँक निश्चित करण्यासाठी वापरली गेली असेल तर संबंधित उमेदवाराची उमेदवारी रद्द करण्यात येईल.

प्रवेशासंबंधीचे वेळापत्रक, समुपदेशनाची अचूक तारखा आणि जागांची उपलब्धता याबाबत अद्ययावत माहिती मेडिकल काउन्सेलिंग कमिटीच्या (MCC) अधिकृत संकेतस्थळावर तसेच आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाच्या mohfw.gov.in या पोर्टलवर उपलब्ध करून दिली जाणार आहे. उमेदवारांनी सतत या संकेतस्थळांची पाहणी करण्याचा सल्ला दिला आहे.

अखिल भारतीय ५० टक्के कोटा हा एमडी, एमएस, डिप्लोमा आणि डीएनबी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी सर्वात महत्त्वाचा टप्पा मानला जातो. तज्ज्ञांच्या मते, NEET PG 2025 चा निकाल आणि अखिल भारतीय कोट्याची गुणवत्ता यादी ही वैद्यकीय शिक्षणातील पुढच्या पायरीसाठी निर्णायक पाऊल आहे. आता सर्वांचे लक्ष MCC च्या समुपदेशन वेळापत्रकाकडे लागले आहे. काही दिवसांतच त्याविषयीची सविस्तर माहिती प्रसिद्ध होणार असून, उमेदवार आणि पालक यांच्यातील उत्सुकता व ताण अधिक वाढला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Tourism : विकेंड गेटवेसाठी उत्तम ठिकाणं महाराष्ट्रातली प्रसिद्ध थंड हवेची ठिकाणं Top 5 ठिकाणं

Manoj Jarange: बॅनरमुळे संघर्ष पेटणार; मुंबईत जरांगेंना डिवचणारी बॅनरबाजी

Chandrapur Accident: भरधाव ट्रकची रिक्षाला जोरदार धडक; रिक्षाचालकासह ६ जणांचा जागीच मृत्यू

Dowry : आणखी एक हुंडाबळी! सासरच्यांनी हुंड्यापायी विवाहितेला पाजलं अ‍ॅसिड, महिलेचा दुर्दैवी अंत

Maharashtra Live News Update: बुलढाण्यात शेगाव-सोनाळा मार्गावर दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक

SCROLL FOR NEXT