नीट पेपरफुटीच्या तणावातून लातूरमधील विद्यार्थिनीची आत्महत्या.
मैथिली सोनवणे डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहत होती.
नातेवाईकांनी मानसिक तणावाला जबाबदार धरले.
संदीप भोसले, साम प्रतिनिधी
नीट पेपरफुटी प्रकरणात दिवसेंदिवस धक्कादायक माहिती समोर येत आहे. या प्रकरणाची सुरुवात राजस्थानमधून होऊन त्याचे धागेदोरे राज्यातील वेगवेगळ्यात जिल्ह्यात सापडले आहेत. या पेपर फुटीचं लातूर कनेक्शन उघड झाले आहे. नीट पेपर फुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांनी आपलं जीवन संपवलंय. आता नीट पेपर फुटीचा आखणी एक बळी गेला आहे.
लातूरमध्ये एका विद्यार्थिनी पेपर फुटीच्या तणावातून गळफास घेत आत्महत्या केली आहे. लातूरच्या गोंदेगाव येथील मैथिली सोनवणे, असे या विद्यार्थिनींचे नाव आहे. डॉक्टर बनण्याचा स्वप्न बाळगणारी मैथिली नीट पेपर फुटल्याने मागच्या काही दिवसापासून तणावात होती, आणि याच ताणतणावातून तिने हे टोकाचं पाऊल उचलल्याच नातेवाईकांनी सांगितलं.
याप्रकरणी गातेगाव पोलिसात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे, दरम्यान वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणाऱ्या नीट युजी परीक्षेचे पेपर फुटल्याने अनेक , विद्यार्थी संभ्रमात आहेत. 3 मे रोजी झालेली परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांना पुन्हा आता 21 जून रोजी नीटची परीक्षा द्यावी लागणार आहे . मैथिली सोनवणेची परिस्थिती अत्यंत हालाखीची असल्याचं सांगितले जाते आहे.
लातूरच्या घटनेआधी गोव्यातील कुडतरी येथील एका विद्यार्थ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या विद्यार्थ्यानेही नीट परीक्षा रद्द झाल्याने जीवन संपवलं होतं. त्याला पेपरही चांगला गेला होता. पण अचानक नीटची परीक्षा रद्द झाल्याचे कळताच हा विद्यार्थी तणावात गेला होता. त्यातून त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आयुष्य संपवलं होतं.
या घटनेमुळे गोळ्यात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विद्यार्थ्याने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहिली होती. ही सुसाईड नोट पोलिसांना सापडली. आपल्याला यापुढे स्पर्धात्मक परीक्षेत बसायचे नाही. मी आयुष्य संपवत असल्याचे त्याने नोटमध्ये लिहिले होते.
नीट पेपर फुटी प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा आरोपी शिवराज मोटेगावकरला सीबीआयने पुण्यातून अटक केली. मोटेगावकर ‘रेणुकाई करिअर सेंटर’ (RCC)चा संचालक असून मुलासाठी त्याने पेपर विकत घेतल्याचे बोलले जात आहे. मोटेगावकरची सध्या चांगलीच चौकशी सुरू आहे. आता त्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक अतिशय धक्कादायक आणि आश्चर्यकारक दृश्य पाहायला मिळत आहे.
प्राध्यापक मोटेगावकर चक्क वर्गातील डेक्सवर उभे दिसत आहेत. त्यांच्या एका हातात पाण्याचा तांब्या आणि दुसऱ्या हातात आंब्याची पाने आहेत. ते या आंब्याच्या पानांनी तांब्यातील पाणी समोर बसलेल्या विद्यार्थ्यांच्या अंगावर शिंपडत आहेत. पाणी शिंपडताना तुम्ही एम्स (AIIMS) ला लागणार आहात आणि हा योग खूप वर्षानंतर आलाय, असं म्हणताना दिसत आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.