saam tv
महाराष्ट्र

NEET पेपरफुटीचा 'गॉड'फादर कोण? 'गॉड' नावाच्या नंबरवरुन संशयास्पद संवाद

NEET Paper Leak Case : NEET पेपरफुटी प्रकरणात दररोज नवनवे खुलासे समोर येतायत. अशातच अटक झालेली मुख्याध्यापिका मनिषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये 'गॉड' नावाचा संशयास्पद नंबर आढळलाय. त्यामुळे पेपरफुटीचा गॉडफादर कोण आहे? सीबीआयच्या तपासात कोणत्या गोष्टी समोर आल्या? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.

Suprim Maskar

नीट पेपरफुटी प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकतोय. तसे सीबीआयच्या तपासात धक्कादायक खुलासे समोर येतायेत. या संपूर्ण प्रकरणाचा गॉडफादर कोण याकडे सगळ्यांचं लक्ष असतानाच अटकेत असलेली मुख्याध्यापिका मनिषा हवालदारच्या चौकशीत रॅकेटचा मास्टरमाईंड कोण याचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.

आरोपी मनिषा हवालदाराच्या पतीचा मोबाईल तपासाच्या दृष्टीने महत्वाचा ठरतोय. कारण मनिषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये 'गॉड' नावानं एक नंबर सेव्ह असल्याचं आढळून आलं. या नंबरशी सबंधित व्यक्तीबरोबर काही संशयास्पद संवाद झाल्याची माहिती आहे.चौकशी दरम्यान चॅट डिलीट केल्याचं उघड झालयं. त्यामुळे डिलीट केलेल्या चॅटमधून आणखी काही खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जातेय.

फॉरेन्सिक तंत्रज्ञानाच्या सहाय्यानं तपास सुरू आहे. डेटा रिकव्हरीच्या माध्यमातून तपास यंत्रणा त्या गॉडफादरचा शोध घेणार आहे. दुसरीकडे मनीषा हवालदार (Manisha Havaldar) हिच्या घरातील झडतीत सीबीआयनं भौतिकशास्त्राच्या प्रश्नांचे 23 पानांचे हस्तलिखित नोट्स जप्त केल्या आहेत. यावेळी आरोपीने सीबीआयला जबाबात काय माहिती दिली पाहूयात.

मनिषा हवालदारचा जबाब काय? (Manisha Havaldar)

मनिषा हवालदारनं जबाबात भौतिकशास्त्राचे प्रश्न काही विद्यार्थी आणि सहआरोपींना दिल्याचं कबुल केलयं. तसेचं पेपरमधील प्रश्न हे व्हाट्सअप, प्रिंटआउटद्वारे पुढे पाठवल्याचंही हवालदारनं सांगितलयं. त्याबरोबर पेपरची शेठ हिरालाल सराफ प्रशाळेतील संगणकावरून प्रिंटआउट काढली आणि प्रश्नत्रिकेच्या बदल्यात एका तरुणाकडून 20 हजार आणि एका महिलेकडून 25 हजार घेतल्याचही हवालदारनं सांगितलं. ही रोख रक्कम मनिषा मांढरेच्या उपस्थितीत घेतल्याचं आणि नंतर कोणाकडूनही पैसे घेतले नाहीत, अशी कबुलीही मनिषा हवालदारनं दिलीय.

दरम्यान मनिषा हवालदारचा पती संजय हवालदार याच्या मोबाईलमधील डेटा 'सेलिब्रेट प्रीमियम' या अत्यंत प्रगत फॉरेन्सिक तंत्रज्ञानाच्या मदतीनं तपासला जात आहे. त्यामुळे हवालदारच्या मोबाईलमधील 'गॉड' ही व्यक्ती NTAचा अधिकारी आहे की कोचिंग क्लासचा संचालक ? हे तपासातून समोर येईल.

नीट पेपरफुटीची साखळी चक्रावून टाकणारी आहे. पुणे ते अहिल्यानगर, नाशिक, राजस्थान, हरीयाणापर्यंतची संशयीतांची एक-एक कडी सीबीआय जोडत गेली आहे. सीबीआयने आत्तापर्यंत अटक केलेल्या 11 जणांपैकी सात आरोपी महाराष्ट्रातील आहेत. त्यामुळे या सर्व आरोपींचा मुख्य सुत्रधार कोण ? आरोपीच्या मोबाईलमधील 'गॉड' कोण ? हे लवकरच समोर येईल एव्हढं मात्र निश्चित.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! केंद्रीय मंत्र्यांचा तडकाफडकी राजीनामा, राष्ट्रपतींकडून मंजुरी, राजकारणात खळबळ

Maharashtra News Live Update: आंदोलनामध्ये मारहाण करणे चुकीचे असे परत होता कामा नये-अमृता फडणवीस

IVF उपचार घेण्याच्या विचारात आहात? कोणत्या टेस्ट होतात, किती येतो खर्च?

जंतरमंतरच्या स्टेजवरच पोलीस कॉन्स्टेबलचा राजीनामा, VIDEO व्हायरल

कलम 324 च्या आडून तुम्ही मनमानी कराल का? SIR च्या ड्युटीवर शिक्षकांना नेमल्याने हायकोर्टाने निवडणूक आयोगाला फटकारलं

SCROLL FOR NEXT