ladki bahin canva
महाराष्ट्र

Ladki Bahin: लाडक्या बहिणींच्या सुरक्षेसाठी खास अॅप! अहिल्यानगरमध्ये राबवला जातोय खास उपक्रम

App For Womens Safety: महिलांच्या सुरक्षेसाठी अहिल्यानगरमधील माजी नगरसेवकाने खास अॅप बनवला आहे.

Ankush Dhavre

लाडकी बहीण सुरक्षित बहीण महिला तसेच युवतींच्या सुरक्षतेसाठी माजी नगरसेवक निखिल वारे यांच्याकडून महिलांना मोफत सुरक्षा ॲप भेट देण्यात येणार आहे. कोणी मोबाईल पळवून नेण्याचा प्रयत्न केला अथवा बळजबरीने बंद करण्याचा प्रयत्न केला तरी त्याचा फोटो आणि व्हिडिओ मोबाईल मध्ये कैद होणार.

विधानसभा निवडणूकीपूर्वी महायुतीकडून लाडकी बहीण योजना सुरु करण्यात आली. महिलांना सक्षम बनविण्यासाठी महायुती सरकारकडून ही योजना सुरु झाली.

त्याच धर्तीवर अहिल्यानगरमध्ये महिला व युवती सुरक्षित राहावे यासाठी माजी नगरसेवक निखिल वारे यांच्या वतीने मोफत सुरक्षा अॅप महिला व युवतीसाठी भेट देण्यात आली आहे.

लाडकी बहीण सुरक्षित बहीण या ब्रीदवाक्यचा वापर करत महिला सुरक्षित राहणे हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे या भावनेतून माजी नगरसेवक निखिल वारे यांनी निडली सॉस हे ॲप्लीकेशन शहरातील सावेडी उपनगरातील महिलांना मोफत उपलब्ध करून दिले आहे.

महिला किंवा युवतींना असुरक्षिततेची भावना तयार होईल किंवा कुठल्याही संकटाची जाणीव झाल्यास मोबाईलमध्ये असलेल्या निडली सॉस या अॅप्लीकेशनचा वापर केल्यास जवळच्या चार नातेवाईकांना आपोआप मेसेज पाठविला जातो.

त्याचप्रमाणे महिला किंवा युवतींचे लाईव्ह लोकेशन देखील नातेवाईकापर्यंत पाठवले जाते. ते लोकेशन ट्रॅक करून संकटग्रस्त मुलींपर्यंत पोहोचण्यास मदत होते त्याचप्रमाणे मोबाईलमध्ये अॅप्लीकेशन असल्यास अशा संकटावेळी मोबाईल मधला सायरन देखील वाजतो आणि त्यामुळे संबंधित समोरील व्यक्ती गोंधळात पडतो हा ॲप महिला व मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा असल्याचे मुलींनी प्रतिक्रिया देताना सांगितले आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eknath Shinde : 'जय गुजरात'च्या घोषणेनंतर एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण, उद्धव ठाकरेंचा VIDEO दाखवत विरोधकांना प्रत्युत्तर

DR. MC Dawar Death : आधी २ रुपये, आता २० रुपयांमध्ये करायचे उपचार; गरीबांचे डॉक्टर पद्मश्री एमली डावर काळाच्या पडद्याआड

Maharashtra Politics: सुषमा अंधारे अन् कुणाल कामराच्या अडचणीत वाढ; विधिमंडळात हक्कभंग प्रस्ताव मंजूर

Maharashtra Live News Update: वाल्मीक कराडची पोलखोल करणाऱ्या विजयसिंह बांगर यांनी घेतली अप्पर पोलीस अधीक्षकांची भेट

Auto Rickshaw Bag : बाजारात आलीये नवीन ऑटो रिक्षा बॅग, फॅशनचा नवा ट्रेंड

SCROLL FOR NEXT