Bhujbal Saam
महाराष्ट्र

Chhagan Bhujbal: अखेर छगन भुजबळ मंत्री झाले! मंत्रिपदाची घेतली शपथ; कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष

Chhagan Bhujbal Takes Oath as Cabinet Minister: महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आज मंगळवारी सकाळी १० वाजता राजभवनात मंत्रीपदाची शपथ घेतली.

Bhagyashree Kamble

महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी आज मंगळवारी सकाळी १० वाजता राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते. छगन भुजबळ यांच्याकडे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण हे महत्त्वाचे खाते सोपवले जाण्याची शक्यता आहे.

नाराजी व्यक्त

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फुट पडल्यानंतर छगन भुजबळ हे अजित पवार गटात गेले होते. दरम्यान, ज्येष्ठ नेते असूनही छगन भुजबळ यांना महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान मिळालं नव्हतं. त्यामुळे त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. भुजबळांनी यापूर्वी सार्वजनिकरित्या आपली खंत मांडली होती.

मुख्यमंत्र्यांकडून संयम बाळगण्याचा सल्ला

अजित पवार यांच्या मंत्रिमंडळातून वगळल्यानंतर छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यावेळी फडणवीसांनी त्यांना संयम राखण्याचा सल्ला दिला होता. मागील सरकारमध्ये भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी होती, जे नंतर धनंजय मुंडे यांच्याकडे गेले. आता पुन्हा तेच खाते भुजबळ यांच्याकडे येण्याची शक्यता आहे.

छगन भुजबळ यांची पहिली प्रतिक्रिया

शपथविधीपूर्वी माध्यमांशी बोलताना भुजबळ म्हणाले, “राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दोन्ही उपमुख्यमंत्री, तसेच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांचे मी मनःपूर्वक आभार मानतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचेही मी आभार मानतो.

येवला-लासलगाव मतदारसंघातील जनतेचे, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे, तसेच समता परिषदेच्या सर्व सहकाऱ्यांचे मी विशेष आभार मानतो. आजवर माझ्यावर दाखवलेल्या प्रेम आणि विश्वासाबद्दल मी सर्वांचा मनापासून आभारी आहे.” असं भूजबळ म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garlic Oil : हाडे आणि सांध्यांच्या आरोग्यासाठी लसूण तेल ठरते फायदेशीर

बस आणि ट्रकचा भीषण अपघात, 10 ते 12 जण जखमी; महामार्गावरील घटनेनं खळबळ|VIDEO

Pune Traffic : वाघोलीतील वाहतूक कोंडीची कटकट कायमची संपणार, पोलिसांनी आखला प्लॅन, उपाय योजनाही सुरू

Fermented Rice Water: शिळे तांदळाचे पाणी प्यायल्यास शरीरावर कसे परिणाम होतात?

Ration Card: घरबसल्या रेशन कार्डमध्ये जोडा कुटुंबातील सदस्याचे नवीन नाव? जाणून घ्या प्रोसेस

SCROLL FOR NEXT