- चेतन व्यास
Shrikanth Shinde : बाप नंबरी बेटा दस नंबरी अशी टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे (ncp youth congress) प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या खुर्चीवर श्रीकांत शिंदे बसल्याचे छायाचित्र व्हायरल झाल्यानंतर खासदार शिंदे यांच्यावर टीकेचे झाेड उठली आहे. ही महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवाची गोष्ट. उथळ पाण्याला खळखळाट फार अशी अवस्था श्रीकांत शिंदेंची झाली आहे असेही शेख यांनी म्हटलं आहे. (Mehboob Shaikh Latest Marathi News)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री यांच्या खुर्चीवर बसून श्रीकांत शिंदे काम करत असल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. या प्रकारावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबूब शेख यांनी सडकून टीका केली आहे. ज्या महाराष्ट्राचं नेतृत्व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून, पवारसाहेब असतील, वसंतदादा असतील अश्या रथी, महारथींनी नेतृत्व केले. त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांच्या खुर्चीवर मुख्यमंत्र्याचं पोरग बसतो म्हणजे हे असं झालं की बाप नंबरी बेटा दस नंबरी अशी बोचरी टीका शेख यांनी केली आहे. वर्धेत शरद युवा संवाद यात्रेदरम्यान आले असताना ते पत्रकारांशी बाेलत हाेते.
शेख म्हणाले मुख्यमंत्री यांच्या खुर्चीवर बसून मुलानं काम करणं ही बाब महाराष्ट्रासाठी अत्यंत दुर्दैवाची म्हणावी लागेल. उथळ पाण्याला खळखळाट फार अशी अवस्था श्रीकांत शिंदेंची झाली आहे. मुख्यमंत्री पद हे एकनाथ शिंदे यांच्या अंगात घुसलं आहे की श्रीकांत शिंदे यांच्या अंगात घुसलं आहे. एकनाथ शिंदे यांनी जी गद्दारी केली तो निर्णय पुत्र प्रेमापोटी केल्याचं आता समोर यायला लागला आहे असेही शेख यांनी नमूद केले.
श्रीकांत शिंदेच्या राजकीय भविष्यासाठी एकनाथ शिंदे अस्थिर होते अशी दबक्या आवाजात चर्चा होती. कुठंतरी आज श्रीकांत शिंदेच्या देहबोली आणी वागण्यातून हे समोर येत आहे. ज्या महाराष्ट्राचं नेतृत्व स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांपासून, पवारसाहेब असतील, वसंतदादा असतील अश्या रथी महारथीनी या महाराष्ट्राचं नेतृत्व केल त्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री यांच्या खुर्चीवर मुख्यमंत्र्याचं पोरग बसतो म्हणजे हे असं झालं की बाप नंबरी बेटा दस नंबरी, असेही मेहबूब शेख यांनी म्हटलं आहे.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.