ajit pawar death Saam tv
महाराष्ट्र

Ajit Pawar Death: अजित पवारांचे AI व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करणाऱ्यांवर होणार कारवाई

Ajit Pawar AI Video: अजित पवार यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्यांच्यासंदर्भातील अनेक व्हिडीओ तयार करून ते शेअर केले जात आहेत. आता अजित पवार यांच्या आवाजातील एआय व्हिडीओ तयार करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.

Priya More

Summary -

  • अजित पवार यांच्या आवाजातील एआय व्हिडिओ व्हायरल होत आहेत

  • राष्ट्रवादी काँग्रेसने कायदेशीर कारवाईचा इशारा दिला

  • अशा व्हिडिओंमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचा आरोप

  • सायबर कायद्यांनुसार दोषींवर गुन्हे दाखल केले जाणार

सचिन जाधव, पुणे

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनामुळे संपूर्ण राज्याला धक्का बसला आहे. अजितदादा आपल्यात नाहीत यावर अजूनही कुणाला विश्वास बसत नाहीये. २८ जानेवारीला बारामतीमध्ये अजित पवार यांचे विमान कोसळले. या विमान अपघातामध्ये अजित पवार यांच्यासह ५ जणांचा मृत्यू झाला. अजित पवार यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर त्याचे अनेक जुने व्हिडीओ व्हायरल होत आहेत. अजित पवार यांच्या आवाजातील अनेक व्हिडीओ तयार करून ते सोशल मीडियावर टाकले जात आहेत. पण आता अशाप्रकारचे व्हिडीओ तयार करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

अजित पवार यांच्या आवाजातील एआय व्हिडिओ टाकल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी यासंदर्भातील पत्र काढले आहे. अजितदादांच्या आवाजातले एआय व्हिडिओ समाज माध्यमातून चालवू नका, असे आवाहन सुनील तटकरे यांनी प्रसिद्ध पत्रक काढून केले आहे. यापुढे अजितदादांच्या आवाजातले एआय व्हिडिओ टाकल्यास कायदेशीर कारवाईचाही इशारा त्यांनी दिला आहे.

राष्ट्रवादीने परिपत्रकात नेमकं काय म्हटलंय?

राष्ट्रवादी काँग्रेसSummary Pointers (Marathi – किमान 4)

  • अजित पवार यांच्या आवाजातील एआय व्हिडिओ व्हायरल होत आहेत.

  • राष्ट्रवादी काँग्रेसने कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

  • अशा व्हिडिओंमुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत असल्याचा आरोप.

  • सायबर कायद्यांनुसार दोषींवर गुन्हे दाखल होणार.

  • नागरिकांना संशयास्पद क्लिप्स शेअर न करण्याचे आवाहन. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या आवाजातील व प्रतिमेतील एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाद्वारे तयार केलेल्या बनावट चित्रफिती व ध्वनिफिती समाजमाध्यमे तसेच विविध इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून प्रसारित होत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही व्यक्ती स्वार्थी राजकीय व सामाजिक हेतू साध्य करण्यासाठी आदरणीय दादांच्या आवाजात खोटी, दिशाभूल करणारी वक्तव्ये पसरवत आहेत. हा प्रकार अत्यंत गंभीर आणि दंडनीय गुन्हा आहे.

आदरणीय दादांबद्दल संपूर्ण महाराष्ट्रात अपार आदर, प्रेम आणि विश्वासाची भावना आहे. त्या भावनेचा गैरफायदा घेऊन जनतेमध्ये व पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा हा घातक प्रयत्न आहे. अशा प्रकारे दिवंगत नेत्याच्या प्रतिमेचा वापर करणे हे अत्यंत हीन आणि निषेधार्ह कृत्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्पष्टपणे इशारा देतो की, संबंधित व्यक्तींनी अशा एआय-निर्मित बनावट चित्रफिती व ध्वनिफितींचे प्रसारण तात्काळ थांबवावे. अन्यथा संबंधितांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सायबर कायद्यांनुसार व अन्य लागू कायद्यांनुसार गुन्हे नोंदवून दोषींना शिक्षा व्हावी यासाठी पक्ष कटिबद्ध आहे. जनतेला व सर्व कार्यकर्त्यांना आवाहन करण्यात येते की, अशा कोणत्याही संशयास्पद ऑडिओ किंवा व्हिडिओ क्लिप्स पुढे पाठवू नयेत,प्रसारित करू नयेत आणि त्यावर विश्वास ठेवू नये. सत्यतेची खात्री न करता कोणतीही माहिती शेअर करणे टाळावे. दिवंगत अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे लोकनेते होते. त्यांच्या निधनानंतर त्यांच्या नावाने असत्य प्रचार करणे हे समाजहिताला बाधक असून लोकशाही मूल्यांना धक्का देणारे आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशा सर्व कृत्यांचा तीव्र निषेध करीत असून संबंधितांनी तात्काळ हे प्रकार बंद करावेत, अन्यथा कडक कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल, याची नोंद घ्यावी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today : पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या, पण सोनं-चांदी झालं स्वस्त; जाणून घ्या २४k, २२k चे ताजे दर

Maharashtra News Live Update: मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील चांदी वाहून नेणारी व्हॅन उलटली

Shehnaaz Gill Dating RCB Cricketer News: आरसीबीच्या 'या' खेळाडूवर शहनाज गिल फिदा? 'त्या' एका फोटोमुळे रंगल्या अफेअरच्या चर्चा

Actors Wife Money Fraud: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याच्या पत्नीची मोठी फसवणूक; BMC च्या बड्या अधिकाऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

High Blood Sugar: ही ७ लक्षणं दिसली तर समजा तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढतंय

SCROLL FOR NEXT