Chandrapur NCP Leader Saam TV
महाराष्ट्र

मदत मागायला आलेल्या विधवा महिलेकडे मागितली खंडणी; राष्ट्रवादीच्या तालुकाध्यक्षाला अटक

विधवा महिलेने ऑल इंडिया पँथर सेना जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष विजय ढोंगे यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

संजय तुमराम साम टीव्ही चंद्रपूर

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur District) पोंभुर्णा तालुक्यात खंडणी वसूली प्रकरणात २ राजकीय नेत्यांवर पोंभुर्णा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रॅक्टर खरेदी प्रकरणात फसवणूक झालेल्या विधवा महिलेने या नेत्यांना मदत मागितली होती. मात्र, नेतेमंडळींनी मदत करण्याऐवजी मदत मागायला आलेल्या विधवा (Widow) महिलेकडूनच विविध मार्गाने 50 हजार रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

दरम्यान या खंडणी प्रकरणी विधवा महिलेने ऑल इंडिया पँथर सेना चंद्रपूर जिल्हाध्यक्ष रुपेश निमसरकार व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP) पोंभूर्णा तालुकाध्यक्ष विजय ढोंगे यांच्याविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून रुपेश निमसरकार व विजय ढोंगे यांच्यावर कलम ३८४, ३८५, ५०६, ३४ भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पाहा -

दरम्यान या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली. पुढील तपास पोंभुर्णा पोलिस कर आहेत.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Loss : लाइफस्टाइलमध्ये करा 'हे' ३ बदल; फक्त ३० दिवसांत वजन होईल कमी अन् दिसाल सडपातळ

Maharashtra News Live Update: दहीहंडीत अश्लील नृत्य; डान्सर निशा मुंबईकर, शुभांगी थोरातसह ८ जणींवर गुन्हा

8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

IAS Transfer : मोठा प्रशासकीय फेरबदल! २७ IAS अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या, कुणाची कुठे नियुक्ती? वाचा

Gram Panchayat: ग्रामीण राजकारणात बदल! मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर फडणवीस सरकारचा मोठा निर्णय; सरपंचांचे अधिकार संपले?

SCROLL FOR NEXT