Sharad Pawar , Kolhapur, Saam TV
महाराष्ट्र

Sharad Pawar On Kolhapur Incident : ...तर ही अवस्था तातडीने बंद झालेली दिसेल; काेल्हापुरच्या घटनेवर शरद पवारांचे आवाहन

बुधवारी काेल्हापूर शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते.

मंगेश कचरे

Sharad Pawar News : कोल्हापूरमध्ये (kolhapur) जे काही घडलं ते महाराष्ट्राच्या (maharashtra) लौकिकतेला शोभणारं नाही. माझ्या राज्यातील सर्वसामान्य जनतेला आणि विशेषत: ज्या ठिकाणी प्रकार घडले त्या ठिकाणच्या जनतेला माझे आवाहन आहे महाराष्ट्र हे संयमी, शांतताप्रिय राज्य आहे. या सगळ्या सर्वसामान्य लोकांना कायदा हातात घेण्यासंबंधीची प्रवृत्ती नाही. कुणीतरी काहीतरी करून जाणीवपूर्वक वादविवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असेल त्यांनाही माझा आक्षेप आहे. याची किंमत सामान्य माणसाला द्यावी लागते. सामान्य माणसाच्या हितासाठी न घडेल याची काळजी घ्या असे मत ज्येष्ठ नेते राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar statement on kolhapur incident) यांनी व्यक्त केले.  (Maharashtra News)

बारामती (baramati) येथे साम टीव्हीशी बाेलताना ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले शासकीय यंत्रणेला सर्वसामान्य लोकांनी मनापासून सहकार्य द्यायची गरज आहे. आपण सगळ्यांनी या यंत्रणेला सहकार्य दिलं तर ही अवस्था तातडीने बंद झालेली दिसून येईल. कोल्हापूर शहर असो आणि अन्य शहरासो या सगळ्या शहरांचा सामाजिक परिवर्तनाचा ऐतिहासिक असा अशी पार्श्वभूमी आहे.

त्यामुळे अशी पार्श्वभूमी अशी असेल तर त्या ठिकाणी शांतता निर्माण झाली पाहिजे. शाहू महाराज, ताराराणी यांचा (kolhapur) आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामान्य माणसांच्या हिताची जपणूक केली पाहिजे. माझी खात्री आहे जर कोण चुकीचे वागत असेल पण बहुसंख्य समाजाने संयमाची भूमिका घेतल्यानंतर राज्य सरकारने त्याच्यामध्ये सामंज्याशी भूमिका घेतल्यानंतर त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित होईल, त्याला सगळ्यांनी साथ द्यावी असे आवाहन पवार यांनी केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Brain Fog: ब्रेन फॉग म्हणजे काय? कारणे कोणती?

Maharashtra Live News Update: यवतमाळच्या स्वस्तिक प्लाझामध्ये आग

Nagpur News : शाळेची सुट्टी बेतली जीवावर; खोल खड्ड्यात बुडून 2 शाळकरी मुलांचा मृत्यू , नागपुरात हळहळ

Vastu Tips For Watch: वास्तुनुसार, घरात घड्याळ कोणत्या दिशेला लावावे?

Monday Horoscope Update : 'या' राशीच्या व्यक्तीने जोडीदाराचा सल्ला घ्यायला विसरु नका, वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT