Nitin Gadkari Saam Tv
महाराष्ट्र

Nitin Gadkari on Maharashtra Politics : अनेकांचे कोट शिवून तयार आहेत, मंत्रिमंडळ विस्तार आणि राजकीय स्थितीवर नितीन गडकरीचं भाष्य

Political News : मंत्रिमंडळात संख्या नाही वाढवता येत नाही, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं.

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

Nagpur News : राष्ट्रवादीतील फुटीनंतर राज्यतील राजकारणाची चर्चा सध्या देशभर सुरु आहे. देशातील अनेक बड्या नेत्यांनी या घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी देखील भाष्य केलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अजित पवार यांच्यासह 9 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र मंत्रिमंडळात राष्ट्रवादीच्या एन्ट्रीने अनेकांचं मंत्रिपदाचं स्वप्न भंगणार आहे. अनेकांनी याबाबत उघडपणे आपली नाराजीही व्यक्त केली. नितीन गडकरी यांनी नेत्यांच्या याच मर्मावर बोट ठेवलं. (Latest Marathi News)

जे नगरसेवक आहेत, त्यांना वाटते आपण आमदार झालो पाहिजे. जे आमदार आहेत, त्यांना मंत्री झालो पाहिजे असे वाटते. जे मंत्री झाले त्यांना चांगले खाते मिळाले पाहिजे असं वाटत असतं.

पण आता जे मंत्री होणार होते त्यांना वाटते की आपण मंत्री होणार की नाही. ते कोट शिवून तयार आहेत. मात्र मंत्रिमंडळात संख्या नाही वाढवता येत नाही, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं. विद्यापीठ शिक्षण मंचातर्फे आयोजित गुरुवंदना आणि सत्कार कार्यक्रमात शिक्षण व्यवस्थेवर बोलताना त्यांनी हे उदाहरण दिले. (Breaking News)

संजय शिरसाटही नाराज

राष्ट्रवादी आमच्यासोबत आली याचं स्वागत आहे. भाजप-शिवसेनेच्या विचारांसोबत सहमत असल्याचा आनंद आहे. राष्ट्रवादी आमच्यासोबत आली किंवा दुसरं कुणीही आलं तरी सत्तेचं विकेंद्रीकरण होतं. त्यामुळे सगळं सोडायचं असेल तर सत्ता कशासाठी? असं म्हणत संजय शिरसाट यांनी उघड नाराजी व्यक्त केली होती. (Latest Political News)

आर्धी भाकरी खावी लागणार

शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी म्हटलं होतं की, नाराज होऊन आता काय करणार. जी वस्तुस्थिती आहे ती स्वीकारली पाहिजे. थोडी नाराजी राहणारच. कारण ज्याला एक भाकरी खायची होती त्याला आर्धीच मिळाली. ज्याला आर्धी खायची त्याला पाव मिळाली. तरीही आम्ही खूश आहोत. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chanakya Niti: पैसा टिकत नाहीये? चाणक्यांचे हे ६ नियम बदलू शकतात तुमचं आर्थिक आयुष्य

Torrent Power Karjat Project: विरोधकांचे फेक नरेटिव्ह; कर्जतचा प्रकल्पातील वृक्षतोडीवर मुख्यमंत्री फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra News Live Update: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणात ११वा आरोपी अटकेत; प्रांजल ठकरानला ६ दिवसांची पोलीस कोठडी

Vaidehi Parshurami: फुलांनी सजली वैदेही परशुरामी! अभिनेत्रीच्या खास फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष

Chakli Recipe : दिवाळीत कुरकुरीत चकली करायची? भाजणीचीही गरज नाही अन् वेळही वाचणार, फक्त फॉलो करा ही रेसिपी

SCROLL FOR NEXT