Rahul Gandhi Meets Sharad Pawar: राहुल गांधींनी घेतली शरद पवारांची भेट, महत्वाच्या विषयांवर झाली चर्चा

राहुल गांधींनी घेतली शरद पवारांची भेट, महत्वाच्या विषयांवर झाली चर्चा
Rahul Gandhi Meets Sharad Pawar
Rahul Gandhi Meets Sharad PawarSaam Tv
Published On

Rahul Gandhi Meets Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीनंतर आज काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पवार यांच्या दिल्ली येथील निवासस्थानी झालेल्या या बैठकीत राहुल गांधी यांनी त्यांच्याशी संवाद साधताना काँग्रेसचा त्यांना पाठिंबा असल्याचं म्हटलं आहे. काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून या दोन्ही नेत्यांच्या भेटीचा व्हिडीओ ट्वीट करण्यात आला आहे.

Rahul Gandhi Meets Sharad Pawar
Chandrayaan 3 Launch Confirm Date : चांद्रयान प्रक्षेपणाची निश्चित तारीख आणि वेळ ठरली, या दिवशी अवकाशात झेपावणार

आम्ही शरद पवार यांच्यासोबत आहोत : राहुल गांधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया दुहान यांनी सांगितले की, राहुल गांधी यांनी शरद पवारांना भेटीदरम्यान सांगितले की, आमचा राष्ट्रवादीला पूर्ण पाठिंबा आहे. काँग्रेस पूर्णपणे राष्ट्रवादीच्या पाठीशी असल्याचे राहुल गांधी म्हणाले. विरोधी पक्षही राष्ट्रवादीसोबत आहेत. (Latest Marathi News)

Rahul Gandhi Meets Sharad Pawar
Ahmednagar News : पाथर्डी माणिकदौंडी घाटातील टँकर अपघात दोघांचा मृत्यू, पोलीस प्रशासनाची माहिती

दरम्यान, अजित पवार गटाने राष्ट्रवादी पक्षाचं नाव आणि निवडणूक चिन्हावर (घड्याळ) दावा केला आहे. या गटाला ४० हून अधिक आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा करण्यात आला आहे. महाराष्ट्र विधानसभेत राष्ट्रवादीचे ५३ आमदार आहेत. यातच आज शरद पवार म्हणले आहेत की, ''राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष मीच आहे. बाकी कोणी काय बोलतोय यात तथ्य नाही.''

भाजपवर हल्लाबोल करत शरद पवार म्हणाले आहेत की, सत्तेत असलेल्यांना, आता सत्तेबाहेर बसावं लागेल. ते म्हणाले आहेत की, मजबुतीने पक्षाला पुढे घेऊन जायचा निर्णय झाला आहे. आजची मीटिंग आमचा उत्साह वाढवणारी होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com