NCP Shivswarajya Yatra Pune:  Pune
महाराष्ट्र

NCP News Pune: 'शिवस्वराज्य' यात्रेत दुर्घटना टळली! अचानक क्रेनमध्ये बिघाड, जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे थोडक्यात बचावले; VIDEO

NCP Shivswarajya Yatra Pune: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून आजपासून शिवस्वराज यात्रेला सुरूवात होत आहे. शिवनेरीवरुन आज या यात्रेचा शुभारंभ झाला असून यात्रेच्या पहिल्याच दिवशी मोठी दुर्घटना टळली.

Gangappa Pujari

जुन्नर, ता. ९ ऑगस्ट २०२४

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून आजपासून शिवस्वराज यात्रेला सुरूवात होत आहे. शिवनेरीवरुन आज या यात्रेचा शुभारंभ झाला असून यात्रेच्या पहिल्याच दिवशी मोठी दुर्घटना टळली. जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला क्रेन च्या सहाय्याने पुतळ्याला हार घालून क्रेन खाली येत असताना अचानक क्रेनच्या ट्रॉलीत बिघाड झाल्याने पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, रोहिणी खडसे तसेच मेहबूब शेख थोडक्यात बचावले. या दुर्घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने राष्ट्रवादी शरद पवार गटाने मोर्चेबांधणी सुरू केली असून आजपासून शिवस्वराज्य यात्रेला सुरूवात होत आहे. शिवनेरी गडाच्या पहिल्या पायरीला अभिवादन करुन या यात्रेला सुरूवात होत आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, रोहिणी खडसे, मेहबूब शेख आदी नेते यावेळी उपस्थित होते. या दरम्यान, क्रेनमध्ये बिघाड झाल्याने जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे पडता पडता वाचले अन् मोठी दुर्घटना टळली.

शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यासाठी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, रोहिणी खडसे आणि मेहबूब शेख क्रेनमध्ये बसले होते. मात्र हार घालून क्रेन खाली येत असताना क्रेनची ट्रॉली बिघडली. यावेळी जयंत पाटील, अमोल कोल्हे, रक्षा खडसे, महबुब शेख यांनी एकमेकांना आधार देत क्रेन खाली उतरवली अन् मोठी दुर्घटना टळली.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

Maharashtra Exit Polls : शरद पवार गट की अजित पवार गट, पुसदमध्ये कोणाचा उमेदवार जिंकणार? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT