Maharashtra Political News Saam Tv
महाराष्ट्र

NCP Merger : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी, शरद पवारांकडून राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाचा प्रस्ताव

Sharad Pawar Latest News : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि काँग्रेसच्या विलीनीकरणाच्या चर्चांना वेग. नाना पटोले, अशोक गेहलोत, संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांच्या प्रतिक्रियांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ.

Namdeo Kumbhar

Sharad Pawar faction merger with Congress latest news : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामे काँग्रेस पक्षाला विलीनीकरणाचा प्रस्ताव दिल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक गेहलोत आणि ठाकरेंचे खासदार संजय राऊतांच्या वक्तव्यानंतर या चर्चेला अधिकच वेग आला आहे. त्यातच सुप्रिया सुळे यांच्याकडूनही सकारात्मक प्रतिक्रिया आल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यात आज नाना पटोले यांनीही विलीनीकरणाच्या प्रस्तावावर भाष्य केलेय.

राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव आधीच दिला होता. पण काही कारणांनी त्याला उशीर झाला. देश विकला जातोय, संविधान व्यवस्था संपत चाललेली आहे, अशा वेळी मतांचा विभाजन थांबविण्यासाठी, धर्मनिरपेक्ष विचारांच्या सर्व पक्षांनी एकत्रित यावं अशा पद्धतीची प्रक्रिया देशपातळीवर सुरू आहे. त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट यांना सोबत घ्यायचं सुरू असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले. ते नागपूरमध्ये साम टीव्हीसोबत बोलत होते.

राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस विलीनीकरण हा प्रस्ताव आज नाही, खूप आधी देण्यात आला होता. त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. राहुल गांधी, सोनिया गांधी, खरगे यांनी याबाबतीत कामाला सुरुवात केली आहे. मोदी सरकारला सत्तेतून बाहेर काढणं हा एकमेव अजेंडा देशासमोर आहे आणि त्यासाठी काँग्रेस काम करत आहे, असेही पटोले म्हणाले.

राऊत काय म्हणाले ?

काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या पक्षांनी शरद पवार यांच्या नेतृत्वात एकत्र यावे, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. त्यावर काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी दुजोरा दिला. ते म्हणाले की संजय राऊत बरोबर बोलले आहेत, जे काँग्रेसमधून वेगळे झाले होते, त्यांनी आता एकत्र यायला हवं. राहुल गांधी यांना इंडिया आघाडीचे नेते मानले पाहिजे. दरम्यान, खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, संजय राऊत यांनी मांडलेले मत हे वैयक्तिक आहे. विलीनीकरणावर काय होतेय, हे भविष्य ठरवेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: अभिजित दिपकेंसह सीपेजीचे ३ नेते कपिल सिब्बल यांच्या निवासस्थानी

Navratri Kamarband Designs : गरबा नाइटसाठी रॉयल लूक! घागरा चोळीवर ट्राय करा कंबरपट्टाचे 'हे' ७ सुंदर डिझाइन्स

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पगारवाढ कधी होणार? एरियर आणि फिटमेंट फॅक्टरबाबत मोठी अपडेट समोर

Blood pressure monitoring: ब्लड प्रेशर घरच्या घरी कसा चेक कराल? जाणून घ्या ७-२-२ चा नियम

Abhijeet Dipke: अभिजीत दीपकेला धोका, ते काहीही करू शकतात; आईने पोलिसांवर केले गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT