Sharad Pawar Group 1st List Saam Tv
महाराष्ट्र

Sharad Pawar Group 1st List: काही दिवसांपूर्वी पक्षप्रवेश, आता थेट उमेदवारी; या ४ दिग्गजांना शरद पवार गटाने दिलं तिकीट; कोणाशी होणार लढत? वाचा...

Maharashtra Assembly Election 2024 : अलीकडेच पक्षात प्रवेश केलेल्या नेत्यांना शरद पवार गटाने तिकीट दिलं आहे. कोणते आहेत हे नेते आणि त्यांची कोणाशी लढत होणार, हेच या बातमीच्या माध्यमातून जाणून घेऊ....

Satish Kengar

विधानसभा निवडणूक जाहीर होताच राष्ट्रवादी शरद पवार गटात मोठ्या प्रमाणात इतर पक्षातील नेत्यांची इनकमिंग पाहायला मिळाली. यातच आज शरद पवार गटाने विधानसभा निवडणुकीसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. आपल्या पहिल्या यादीत शरद पवार गटाने ४५ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. याच यादीत काही अशीही नावे आहेत, ज्यांनी काही दिवसांपूर्वीच शरद पवार गटात प्रवेश केला आणि आज त्यांना थेट उमेदवारी जाहीर झाली आहे. यामध्ये कोणा-कोणाला संधी मिळाली आहे. हे जाणून घेऊ...

शरद पवार गटात अलीकडेच प्रवेश केलेल्या

अजित पवार यांची साथ सोडत अलीकडेच शरद पवार गटात पक्षप्रवेश केलेल्या राजेंद्र शिंगणे यांना सिंदखेडराजा येथून तिकीट देण्यात आलं आहे. तर भाजपला रामराम ठोकत पक्षात आलेल्या हर्षवर्धन पाटील यांना इंदापूरमधून तिकीट देण्यात आलं आहे.

यातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जाणारे समरजीत घाटगे यांनी अलीकडेच भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांना कागलमधून उमेदवारी देण्यात आली आहे. याशिवाय भाजप नेते गणेश नाईक यांचे पुत्र यांनीही अलीकडेच शरद पवार गटात प्रवेश केला. पक्षाने त्यांना बेलापूरमधून उमेदवारी जाहीर केली आहे.

हसन मुश्रीफ विरुद्ध समरजीत घाटगे

कागल विधानसभा मतदारसांघात समरजीत घाटगे विरुद्ध अजित पवार गटाचे मंत्री हसन मुश्रीफ सामना पाहायला मिळणार आहे. घाटगे हे हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक मानले जातात. या दोन्ही नेत्यांमध्ये अनेकदा शाब्दिक चकमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. यातच आता येथून कोण बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मंदा म्हात्रे विरुद्ध संदीप नाईक

बेलापूर विधानसभा मतदारसंघात संदीप नाईक यांच्याविरोधात भाजपच्या मंदा म्हात्रे यांच्या विरोधात लढत पाहायला मिळणार आहे. मंदा म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर होताच भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांनी शरद पवार गटात प्रवेश केला होता. बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही जागांसाठी गणेश नाईकांनी फिल्डिंग लावली होती. मात्र म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर झाली. यानंतर आता हे दोन्ही उमेदवार रिंगणात आहेत.

इंदापूर विधानसभा मतदारसंघातून हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे मैदानात आहे. दरम्यान, सिंदखेडराजा विधानसभा मतदानघातून राजेंद्र शिंगणे यांच्या विरोधात अद्याप प्रमुख पक्षांपैकी कोणत्याही पक्षाने आपला उमेदवार झहीर केलेला नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

Maharashtra Politics : मुंबईत होणार मराठीची एकजूट; ठाकरेंची युती, महायुतीला धडकी? Video

Ladki Bahin Yojana: महिलांना कधी मिळणार जूनचा हप्ता? आदिती तटकरेंनी थेट तारीखच सांगितली

SCROLL FOR NEXT