Sharad Pawar saam tv
महाराष्ट्र

Sharad Pawar : महाराष्ट्रातील भाजपच्या 'मिशन ४५' वर शरद पवारांनी भाजपाध्यक्ष नड्डांना करुन दिली 'ही' आठवण

प्रत्येक पक्षाला आपला जनाधार वाढवण्याचा अधिकार आहे असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

साम न्यूज नेटवर्क

Sharad Pawar : महाराष्ट्रात भाजपच्या २०२४ च्या लोकसभा प्रचाराची सुरुवात 'मिशन ४५' या घोषणेने केली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४५ नव्हे तर ४८ जागा आहेत अशी खिल्ली उडवत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (sharad pawar latest marathi news) यांनी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यावर निशाणा साधला. पवार यांनी भाजपच्या अध्यक्षांना हिमाचल प्रदेश या त्यांच्याच राज्यात विधानसभा निवडणुकीत पक्षाचा पराभव झाल्याची आठवणही करून दिली. (Maharashtra News)

ज्येष्ठ नेते शरद पवार आज सातारा (satara) शहरात आले आहेत. रयत शिक्षण संस्थेतील 50 वर्षाच्या याेगदानाबद्दल त्यांचा आज संस्थेतर्फे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. त्यासाठीची जय्यत तयारी पुर्णत्वास आली आहे. आज पवार यांचे शहरात आगमन हाेताच. त्यांची राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित सरपंच आणि ग्रामपंचयात सदस्यांनी भेट घेतली. त्यानंतर पवार हे रयत शिक्षण संस्थेच्या (sharad pawar in rayat shikshan sanstha) बैठकीला रवाना झाले.

दरम्यान मंगळवारी झालेल्या पत्रकार परिषदेत माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना पवार यांनी, "मला आश्चर्य वाटते... त्यांनी (भाजप) मिशन 48 सुरू करायला हवे होते कारण महाराष्ट्रात लोकसभेच्या 45 नव्हे तर 48 जागा आहेत." ते त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि पक्षाकडे त्यांना अध्यक्ष म्हणून निवडण्याचा अधिकार आहे, पण राज्यात आणि केंद्रात सत्ता असूनही ते निवडणुकीत (हिमाचल प्रदेशात) यशस्वी होऊ शकले नाहीत. त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही असा चिमटा देखील पवार यांनी नड्डा यांना काढला. (Tajya Batmya)

'लव्ह जिहाद' विरोधात कायदा करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रात (maharashtra) हिंदुत्ववादी संघटनांकडून काढण्यात येत असलेल्या मोर्च्यांबाबत विचारले असता पवार म्हणाले, केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आहे. पवार म्हणाले, ''ते निर्णय घेऊ शकतात... कोणाचा विरोध आहे?'' असा सवालही त्यांनी केला.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Political News : मोठी बातमी! भाजप खासदारावर जीवघेणा हल्ला, राजकीय वर्तुळात खळबळ

Crime News: १४ वर्षाच्या मुलाच्या मनात सुडाची भावना; ५ वर्षाच्या मुलाला संपवलं, तपासात धक्कादायक कारण आलं समोर

Maharashtra Politics : भाजप मंत्र्यांकडून ऑपरेशन लोटस; बडा नेता कमळ हाती घेणार?

Accident News : हृदयद्रावक! दिवाळीला मामाच्या गावी जाताना काळाचा घाला; थारच्या धडकेत दोन मुलांसह आई-वडिलांचाही मृत्यू

यशस्वी जैस्वाल, हर्षित राणा OUT; ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात अशी असेल भारताची Playing XI

SCROLL FOR NEXT