Amol Kolhe  Saam Tv
महाराष्ट्र

Amol Kolhe News : बेळगावचा उल्लेख बेळगावी; अमोल कोल्हेंनी व्यक्त केली दिलगिरी

NCP Amol Kolhe News : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी बेळगावचा उल्लेख बेळगावी असा केला होता. या प्रकरणी आता अमोल कोल्हे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.

Shivani Tichkule

Amol Kolhe Twitter Video : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी बेळगावचा उल्लेख बेळगावी असा केला होता. या प्रकरणी आता अमोल कोल्हे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. आपल्याकडून घाई गडबडीत आणि अनावधानाने बेळगावचा बेळगावी असा उल्लेख झाला, असे स्पष्टीकरण कोल्हेंनी दिलं आहे. आपल्या भावना दुखावल्यात्याबद्दल सर्वांची माफी मागतो, असंही कोल्हे म्हणाले. यासंबधीचा एक व्हिडिओ अमोल कोल्हे यांनी आपल्या ट्वीटरवर पोस्ट केला आहे.  (Latest Marathi News)

व्हिडिओमध्ये काय म्हणाले अमोल कोल्हे?

अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले, "जय शिवराय, बेळगाव येथे राजहंस गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याचा अनावरण होतं म्हणून मला या कार्यक्रमासाठी आवर्जून निमंत्रित करण्यात आलं होतं. परंतु माझ्या अनेक सीमाभागातील बांधवांनी, अनेक हितचिंतकांनी या संपूर्ण कार्यक्रमाच्या मागच्या पार्श्वभूमीची मला कल्पना करून दिली. त्या कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी माझ्याकडून अनावधानाने आणि घाई गडबडीत बेळगावचा चुकीचा उल्लेख झाला. त्याबद्दल मी आधीच दिलगिरी व्यक्त केली आहे.  (Maharashtra Political News)

"पण मी माझ्या सीमा बांधवांबरोबर मी ठामपणे उभा आहे आणि त्यांच्या विनंतीवरून त्यांच्या आग्रही मागणीवरून 5 तारखेचा बेळगाव मधल्या राजहंस गडावरच्या माझा येण्याचा कार्यक्रम मी रद्द करतो. या कार्यक्रमाला मी उपस्थित राहणार नाही. तुमच्या ज्या न्याय मागण्या आहेत त्याबरोबरच मी ठामपणे उभा आहे. त्याविषयी विश्वास बाळगा, असं स्पष्टीकरण अमोल कोल्हे यांनी यावेळी दिलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

सांगलीत राष्ट्रवादीला मोठा धक्का! महापालिकेतील नगरसेविकेचं पद जाणार? काय आहे कारण?

मित्राला वाचवताना दोघेही खदानीत बुडाले; तिघांच्या मृत्यूनं गावावर शोककळा

जगात सर्वाधिक पाऊस मुंबईत, 5 दिवसांत 920 मिमी पावसानं वाढवलं टेन्शन? समुद्राची पातळी वाढणार, मुंबई बुडणार?

मुंबईला उद्याही पावसाचा अलर्ट, बुधवारी शाळा-ऑफिस चालू की बंद? व्हायरल मेसेजबाबत BMCकडून मोठा खुलासा

4 महिन्यांपूर्वीच सिया-चेतनचं गुपचूप लग्न? व्हॉट्सअॅप चॅटमधून मोठं गूढ उकलणार?

SCROLL FOR NEXT