Eknath Khadse
Eknath Khadse Saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Political News : 'गोपीनाथ मुंडे आणि मी ३०-३५ वर्षे...'; आमदार एकनाथ खडसेंनी केला गौप्यस्फोट

संजय जाधव

Eknath Khads News : राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते, आमदार एकनाथ खडसे यांच्या गौप्यस्फोटानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. खडसे यांनी भाजप नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याची आठवण देखील भाजपला करून दिली. (Latest Marathi News)

एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले, भाजपने नेहमीच ओबीसींची हेळसांड केलेली आहे. भाजपमध्ये (BJP) आतापर्यंत अण्णासाहेब डांगे, भाऊसाहेब फुंडकर , गोपीनाथ मुंडे यासारख्या अनेक नेत्यांना अपमान सहन करावा लागला. त्याचबरोबर त्रास देण्यात आला. त्यानंतर माझी आणि पंकजा मुंडे यांचीही छळवणूक करण्यात आली'.

'सर्व नेते पक्षाशी एकनिष्ठ राहून पंकजा ताईंना अपमानास्पद वागणूक देण्यात आली. आता पंकजा मुंडे या सक्षम नेत्या आहेत. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आहेत. त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग आहे, असे खडसे म्हणाले.

'आता निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे यांना आता ओबीसी चेहरा पाहिजे. पंकजाताई या ओबीसी आहेत आणि आता मतांची गरज आहे. त्यामुळे भाजप आता नक्कीच त्यांचा चेहरा निवडणुकांमध्ये वापरणार आहे, असेही खडसे म्हणाले.

'गोपीनाथ मुंडे आणि मी तीस-पस्तीस वर्षे एकत्र काम केलं. त्यावेळी वाणी -ब्राह्मणांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपला आमच्यामुळे सर्वसामान्यांच्या पक्ष म्हणून ओळख मिळाली. पूर्वी भाजपमध्ये ओबीसींना घेत सुद्धा नव्हते. गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांना भाजपने किती त्रास दिला हे मला माहिती आहे, असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला.

'इतकंच काय त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी सकाळी चार वाजेपर्यंत वाट बघण्यास भाग पाडलं. मध्यंतरी त्यांना इतका त्रास देण्यात आला की त्यांच्या मनात पक्ष सोडण्याचा विचार सुद्धा आला होता. तीच परिस्थिती आता पंकजा मुंडेंवर ओढावलेली आहे. सातत्याने भाजपने ओबीसींवर अन्याय करण्याची नीती अवलंबली तरीही ओबीसींनी पक्ष वाढवण्यासाठी मदत केली, असेही खडसे पुढे म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Non Stick Pan : चायनीज बनवताना वापरा 'या' टिप्स; नुडल्स आणि राइस कढईला चिटकणार नाहीत

Arvind Kejriwal News: 'आम्हाला अटक करा..' CM केजरीवाल यांचा भाजप कार्यालयावर मोर्चा; कलम १४४ लागू, दिल्लीत हायहोल्टेज ड्रामा!

Maharashtra Politics : छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट; म्हणाले, "त्यावेळी मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो असतो"

Sangli News : सांगलीत खासदार कोण? पैज लावणं पडलं महागात!

Lok Sabha Election 2024 : "मुंबईकरांनो, आवर्जुन मतदान करा..."; सेलिब्रिटींनी चाहत्यांना मतदानाचा हक्क बजावण्याचं केलं आवाहन

SCROLL FOR NEXT