Non Stick Pan : चायनीज बनवताना वापरा 'या' टिप्स; नुडल्स आणि राइस कढईला चिटकणार नाहीत

Non Stick Pan for Chinese Recipe : कढईमध्ये विविध चायनीज राईस बनवताना देखील ही टिप्स फॉलो करा. याने राइस देखील कढईला चिटकणार नाही. तसेच कढईसुद्धा जास्त खराब होणार नाही.
Non Stick Pan for Chinese Recipe
Non Stick Pan Saam TV

प्रत्येक व्यक्तीला चायनीजची चव फार आवडते. चायनीज खाण्यासाठी काही व्यक्ती विवध हॉटेल्सला भेट देतात. तर काहींची भूक तेथेही भागत नाही त्यामुळे ते थेट घरच्याघरी चायनीज बनवतात. आता घरी चायनीज बनवायचं म्हटलं की नॉनस्टीक भांडं हवं असतं.

Non Stick Pan for Chinese Recipe
Kuan Kung Chinese Temple Mumbai: मुंबईतील चिनी वारसा जपणारं १५० वर्षे जुने मंदिर; कुठे आणि कधी खुले असते? वाचा

अनेक महिला घरी एकदम टेस्टी चायनीज बनवतात. मात्र काही महिलांना घरी चायनीज नीट बनवता येत नाही. त्या सर्व मसाले व्यवस्थित वापरतात मात्र नुडल्स कढईत टाकल्यावर ते कढईला चिकटतात. त्यामुळे असे तुटलेले नुडल्स खाणे कुणालाच आवडत नाही. तुम्ही देखील असे नुडल्स खाण्यास नकारच देत असणार. त्यामुळे आज कढईला नुडल्स किंवा भात चिटकूनये यासाठीच्या टिप्स पाहू.

कढईत सुरुवातील देव्हा आपण भात किंवा नुडल्स टाकतो तेव्हा ते शिजत अताना चिकटून राहतात. त्यामुळे रेसिपी बनवण्यास घेण्याआधीच कढईत एक थोडं तेलं टाका. कढई चांगली तापवून घ्या. नंतर हे तेल बाजूला दुसऱ्या वाटीत काढून घ्या. त्यानंतर कढई पुन्हा गॅसवर ठेवा. यामुळे कढईमध्ये कोरडापणा जास्त राहत नाही, कढई सॉफ्ट आणि नॉनस्टीकी बनते.

कढईमध्ये विविध चायनीज राईस बनवताना देखील ही टिप्स फॉलो करा. याने राइस देखील कढईला चिटकणार नाही. तसेच कढईसुद्धा जास्त खराब होणार नाही. कढईला पदार्थ चिकटल्याने ते निट वाढता येत नाहीत. कढईला पूर्ण खासून खासून राईस आणि नुडल्स काढावे लागतात.

शिवाय जेवण झाल्यानतंर भांडी घासतानाही बराच त्रास होतो. पिठापासून बनलेले नुडल्स घट्टपणे कढईला चिकटतात. त्यामुळे कढई किंवा टोप काहीवेळ पाण्यात भीजत ठेवावा लागतो त्यानंतर घासून तो स्वच्छ होतो. या सर्व समस्यांपासून वाचण्यासाठी तुम्ही देखील नुडल्स आणि राइस बनवताना या टिप्स फॉलो केल्या पाहिजेत.

Non Stick Pan for Chinese Recipe
Raggi Noodles Recipe : मुलांसाठी बनवा टेस्टी आणि हेल्दी नाचणीचे नुडल्स, आवडीने खातील; पाहा रेसिपी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com