साम टिव्ही ब्युरो
मुंबईतील माझगाव डॉकजवळ एका चिंचोळ्या गल्लीत प्रशस्त चिनी मंदिर आहे.
माझगावमधील हे चिनी मंदिर दीडशे वर्ष जुने आहे.
मंदिरातील बहुतांश वस्तू लाल रंगातील आहे. कारण चिनी लोक लाल रंगाल शुभ मानतात.
चिनी मंदिराचं प्रवेशद्वार पवन चिमण्या, कागदाचे कंदील आणि चिनी शिलालेखांनी सजवलं आहे.
चिनी लोक मंदिरातील पूज्य व्यक्तीला ओवळताना निरंजनाचा नाही तर मेणबत्तीचा वापर करतात.
मंदिरात बुद्ध आणि इतर पूज्य व्यक्तींच्या मूर्ती आहेत.
माझगावमधील चिनी मंदिरात क्वान कुंग देवाबरोबरच क्वांग यिम या देवीची उपासना होते.
गोदीत काम करणाऱ्या चिनी लोकांनी माझगावमध्ये १९१९ साली हे मंदिर उभारलं.
रेल्वेच्या भायखळा स्थानकापासून किंवा हार्बर मार्गावरील डॉकयार्ड रोड स्थानकाजवळ हे मंदिर आहे. नवाब टँक मार्गाजवळ हे मंदिर प्रशस्त मंदिर आहे.
चिनी मंदिर सकाळी १० ते सायंकाळी ६.३० या वेळेत खुले असते.