Maharashtra Political News :...तर ते सर्वच्या सर्व आमदार उद्धव ठाकरेंकडे परततील; राज्याच्या माजी मंत्र्यांचं मोठं विधान

राष्ट्रपती लागवटीच्या केलेल्या वक्तव्यावर माजी मंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ठाम आहेत.
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray NewsSaam TV

Jayant Patil News : राष्ट्रपती लागवटीच्या केलेल्या वक्तव्यावर माजी मंत्री, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ठाम आहेत. 'सर्वोच्च न्यायालयाच्या निकाल लागल्यावर आपात्रता झाली तर शिवसेनेचे आमदार पुन्हा उद्धव ठाकरेंकडे परततील आणि मग भाजपा नेतृत्वाला दुसरा पर्यायच उरणार नाही, असे मोठे विधान राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. ते सांगलीत बोलत होते. (Latest Marathi News)

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार उभे करणार का, यावरून राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. या चर्चेवर भाष्य करताना जयंत पाटील म्हणाले, 'कर्नाटक निवडणुका लढण्याचा निर्णय राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि वरिष्ठ नेते घेतील मी एक छोटा कार्यकर्ता आहे'.

Uddhav Thackeray News
Maharashtra Political News: शिंदे-फडणवीस सरकारला मोठा झटका; मुंबई हायकोर्टाकडून आमदार निधी वाटपाला स्थगिती, कारण?

शिंदे सरकारवर टीका करताना जयंत पाटील (Jayant Patil) म्हणाले, 'या सरकारकडून शेतकऱ्यांसाठी कोणतेही मदत झालेली दिसत नाही. म्हणून हे सरकार सर्व आघाड्यावर अपयशी आहे. हे सरकार फक्त कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डर यांचे आहे. हे सरकार शेतकऱ्यांचं आणि शेतमजुरांचं नाही. ही खात्री आता महाराष्ट्रातील जनतेला पटले आहे'.

Uddhav Thackeray News
Nitin Gadkari on Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचे काम केव्हा पूर्ण होणार? नितीन गडकरींनी दिली मोठी अपडेट

मंत्रिमंडळातील आमदार गुवाहाटीला जाणार यावर पाटील म्हणाले, ज्या मंत्री मंडळाचा सगळे आमदाराचा एक वेळा बळी देण्याचा प्रकार घडला होता. आता हा दुसरा त्यांचा प्रवास आहे.. आणि महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारसरणीचा महाराष्ट्र आहे. त्या पुरोगामी विचार करणारे माणसं महाराष्ट्रातल्या जनतेला मला नाही वाटत काही रुचेल, असेही जयंत पाटील म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com