अक्षय गवळी, साम टीव्ही
Amol Mitkari News : अकोला शहरातील शिवणी परिसरात उभारण्यात आलेल्या म्हाडाच्या घरांच्या चाव्या स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर लाभार्थ्यांना देण्यात आल्या. मात्र, घर मिळवण्याच्या प्रक्रियेत लाभार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट झाल्याचा गंभीर आरोप खुद्द सरकारमधील राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलाय.
सुरुवातीला लाभार्थ्यांना प्रत्येकी घर केवळ 5 लाख 50 हजार रुपयांत मिळेल, असे सांगण्यात आले होते. परंतु, चाव्या मिळेपर्यंत हा आकडा नऊ लाख रुपयांपपार गेला असल्याचे अनेकांनी सांगितले. या अचानक वाढलेल्या खर्चामुळे घर घेणाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळलीये.
लाभार्थ्यांच्या तक्रारीनुसार, घर बुकिंगच्या वेळी स्वतंत्र शुल्क आकारले गेले, त्यानंतर लाईट फिटिंग, वॉशरूम, व इतर मूलभूत सुविधांसाठी स्वतंत्र पैसे मागण्यात आले. एवढेच नाही तर, बँकेकडून लोन मंजूर करून देण्यासाठीही काहींनी हजारोंची रक्कम उकळल्या. या प्रक्रियेत काही खासगी एजंट खुलेपणाने फिरत होते, आणि त्यांचा म्हाडाच्या संबंधित काही कर्मचाऱ्यांशी संगनमत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आलाय.
तर काही लाभार्थ्यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्याकडे तक्रारी मांडल्या. मिटकरींनी म्हाडाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली. मात्र, अधिकाऱ्यांकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत, परिणामी, ‘म्हाडाचे घर’ ही सर्वसामान्यांसाठी स्वप्नपूर्ती न ठरता ‘लुटीचा अड्डा’ बनल्याची टीका होत आहे.
अकोलाच्या मूर्तिजापूर शहरातील बुब पेट्रोलपंप येथे एका सरपंचाला बेदम मारहाण करण्यात आली. दोन जणांकडून जबर मारहाण झाली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झालीये. या मारहाणीचं मूळ कारण समोर आलेलं नाही.
मूर्तिजापूरच्या निंबा गावाचे सरपंच प्रदीप फुके दैनंदिन कामे आटपून गावी जात होते. त्यावेळी वाटेतच पेट्रोल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर थांबले. याचवेळी रांगेत उभे राहण्याच्या कारणावरून हा वाद झाला अन या वादादरम्यान सरपंच फुके यांना 2 व्यक्तींनी मारहाण केली. हा मारहाणीचा प्रकार पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. या प्रकरणात मुर्तीजापुर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.