Eknath shinde and Devendra Fadnavis  saam tv
महाराष्ट्र

'मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी...'; NCP च्या आमदाराने शिंदे सरकारला दिला मंत्रिमंडळ विस्तारासाठी सल्ला

राज्यात मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

साम टिव्ही ब्युरो

नवनीत तापडिया

औरंगाबाद : राज्यात सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे दोघेच सरकार चालवत आहे. या दोघांच्या मंत्रिमंडळाकडूनच राज्यातील प्रश्नांवर निर्णय घेतले जात आहेत. तसेच राज्यात नवं सरकार स्थापन करून चार आठवड्यांहून अधिक काळ लोटला आहे. त्यामुळे राज्यात मंत्रिमंडळ विस्तार केव्हा होणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Amol Mitkari News In Marathi )

राज्यातील काही जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. तर काही जिल्ह्यात पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनत नुकसान झाले आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी सदर जिल्ह्यात जाऊन पूरपरिस्थितीची देखील पाहणी केली होती. पंरतु राज्यात अतिवृष्टी होत असताना राज्यात केवळ दोन जणांचं मंत्रिमंडळ असल्याने शिंदे सरकारवर टीका होत आहे. यावरून आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील टीका केली आहे. मिटकरी म्हणाले, 'राज्यात अतिवृष्टी होत असताना मंत्रिमंडळ विस्तार न करणे हा राज्यातील जनतेचा अपमान आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिल्ली वाऱ्या करू नये, तर त्या ठिकाणी ताटकळत बसावे लागते, असा सल्ला अमोल मिटकरी यांनी शिंदे सरकारला दिला आहे.

अमोल मिटकरी पुढे म्हणाले, 'राज्यपाल आणि देशातील अनेक लोकांकडून संविधानाची पायमल्ली होत आहे, ते वाचविण्यासाठी आम्ही येथे आलो आहे. प्रसार माध्यमांमध्ये आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्या असं दाखविले जात आहे म्हणजे राष्ट्रपती पदाला जातीचं लेबल कोण चिटकवत आहे ?' असा प्रश्न त्यांनी केला. '15 व्या राष्ट्रपती यांची पूजा करणे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात पूजा करणे ही संविधानाची पायमल्ली आहे, असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supplements: 'हे' सप्लीमेंट्स चुकूनही एकत्र घेऊ नका नाहीतर, आरोग्यावर होईल परिणाम

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा झटका, नाना पटोले यांचे निकटवर्तीय भाजपात जाणार

Ahilyanagar News: विद्यार्थी की मजूर? शाळा मग्रुर; मुलांना ट्रक खाली करायला लावला, सामच्या बातमीच्या दणक्यानंतर होणार कारवाई

Nepal Protest : नेपाळ पेटलं, चटके भारताला? शेजाऱ्यानं वाढवलं देशाचं टेन्शन, VIDEO

Maharashtra Politics : एकनाथ शिंदेंना धक्का बसणार? नाराज पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी केला फोन, Video

SCROLL FOR NEXT