Gadchiroli Crime: राष्ट्रवादी आमदाराच्या सुरक्षा रक्षकाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या Saam Tv
महाराष्ट्र

Gadchiroli Crime: राष्ट्रवादी आमदाराच्या सुरक्षा रक्षकाची डोक्यात गोळी झाडून आत्महत्या

सुरक्षारक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गडचिरोली: गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यात अहेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार धर्मराव बाबा आत्राम (MLA Dharmarao Baba Atram) यांच्या सुरक्षारक्षकाने आत्महत्या (self-slaughter) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित सुरक्षा रक्षकाने काल सायंकाळी डोक्यात गोळी झाडून (Shoot) आत्महत्या केली आहे. आपल्या राहत्या घरामधेच अशाप्रकारे भयावह शेवट केल्यामुळे पोलीस (Police) प्रशासनात मोठ्या प्रमाणात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी (Police) घटनास्थळी धाव घेतली आहे. (NCP MLA security guard shot himself head)

हे देखील पहा-

पोलिसांनी (Police) घटनास्थळाचा पंचनामा केला असून पुढील तपास केला जात आहे. प्रमोद शेकोकर असे आत्महत्या करणाऱ्या पोलीस (Police) शिपायाचे नाव आहे. ते मूळ बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. सध्या ते अहेरी येथील पॉवर हाऊस कॉलनीतील (colony) एका अपार्टमेंटमध्ये वास्तव्याला होते. मृत शेकोकर यांची पत्नी देखील पोलीस दलामध्ये असून त्या ताडगाव (Tadgaon) पोलीस मदत केंद्रात कार्यरत आहेत. प्रमोद शेकोकर यांनी घरगुती कारणावरून आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

अहेरी पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रमोद शेकोकर हे काही दिवसाअगोदर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्याकडे सुरक्षा रक्षक म्हणून रुजू झाले होते. सर्वकाही सुरळीमाडे सुरू असताना काल रात्री ८ वाजेच्या सुमारास शेकोकर यांनी आपल्या राहत्या घरात स्वत:वर गोळी झाडून घेतली आहे. या घटनेची माहिती मिळताच अहेरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर आणि अहेरीचे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्याम गव्हाणे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पण घराचा दरवाजा आतून बंद होता.

यामुळे पोलिसांनी दुसऱ्या घरामधून शेकोकर यांच्या घरात प्रवेश करण्यात आला. घरातील चित्र बघून पोलीस देखील हादरून गेले होते. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविण्यात आला आहे. शेकोकर यांनी नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची कोणती देखील माहिती अद्याप समोर आली नाही. आत्महत्येचा कारणाचा पोलीस शोध घेत आहेत. त्या अनुषंगाने नातेवाईकांची चौकशी केली जात आहे. घरगुती कारणातून त्यांनी आत्महत्या केली असावी, असा संशय पोलिसांना आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Aadhaar Card Update: आता फुकटात करा आधार कार्ड अपडेट ; फक्त या स्टेप्स करा फॉलो

Priya Bapat : प्रिया बापटचा भन्नाट परफॉर्मन्स; लाईव्ह कॉन्सर्टमधील गाण्याचं होतंय कौतुक

Maharashtra News Live Updates: अंधेरी पश्चिमेतील एका इमारतीला भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

Viral Video: भीषण वास्तव! इंजीनियरिंगची फी भरण्यासाठी पैसे नाहीत तरुणाने केली तब्बल ५४ मोबाईलची चोरी; घटनेचा CCTV व्हायरल

Maharashtra Air Pollution: सांगलीकर लय भारी, हवा सर्वात शुद्ध; मुंबई-पुण्याला टाकले मागे

SCROLL FOR NEXT