Bihar: बापरे! डॉक्टरांनी 55 वर्षीय रुग्णाच्या पोटातून काढला ग्लास; रुग्ण सुखरूप

डॉक्टरांच्या एका टीमने ऑपरेशच्या दरम्यान ५५ वर्षाच्या व्यक्तीच्या पोटातून काचेचा ग्लास बाहेर काढला आहे.
Bihar: बापरे! डॉक्टरांनी 55 वर्षीय रुग्णाच्या पोटातून काढला ग्लास; रुग्ण सुखरूप
Bihar: बापरे! डॉक्टरांनी 55 वर्षीय रुग्णाच्या पोटातून काढला ग्लास; रुग्ण सुखरूपSaam Tv

वृत्तसंस्था: डॉक्टरांच्या एका टीमने ऑपरेशच्या (operation) दरम्यान ५५ वर्षाच्या व्यक्तीच्या पोटातून काचेचा ग्लास (Glass ) बाहेर काढला आहे. ही घटना बिहार (Bihar) येथील आहे. डॉक्टरानी दिलेल्या माहितीनुसार, रुग्ण (Patient) बद्धकोष्ठता आणि तीव्र पोटदुखीने अतिशय वैतागला होता. मुझफ्फरपूरच्या (Muzaffarpur) मादीपूर भागात असलेल्या एका खाजगी रुग्णालयात (hospital) तो उपचार देखील घेतला होता. डॉक्टरांनी ऑपरेशन (operation) करून त्याच्या पोटातून काचेचा ग्लास बाहेर काढला. (Bihar Doctors Removed Glass from Stomach)

हे देखील पहा-

वैशाली जिल्ह्यामधील (district) महुआ येथील रहिवासी असलेल्या रूग्णावर शस्त्रक्रिया करणार्‍या डॉक्टरांच्या टीमचे नेतृत्व करणारे डॉ. महमुदुल हसन यांनी दिलेल्या माहितीनुसार की, रूग्णाच्या अल्ट्रासाऊंड आणि एक्स-रे (X-ray) अहवालामध्ये त्याच्या आतड्यांमध्ये काहीतर गंभीर गडबड असल्याचे दिसून आले आहे. ऑपरेशनचे आणि एक्स- रेचे व्हिडिओ फोटो (Photo) शेअर करण्यात आला आहे 'काचेचा ग्लास रुग्णाच्या (patient) शरीरामध्ये कसा पोहोचला, हे अजून देखील गुपितच राहिले आहे.' ते म्हणाले की, आम्ही विचारले असता, रुग्णाने चहा पित असताना ग्लास गिळल्याचे सांगितले आहे. पण त्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.

Bihar: बापरे! डॉक्टरांनी 55 वर्षीय रुग्णाच्या पोटातून काढला ग्लास; रुग्ण सुखरूप
Dr. Suvarna Waje Nashik: डॉ. सुवर्णा वाजे यांचा खून साडेतीन कोटींसाठी; पोलिसांच्या तपासात आले समोर?

मानवी अन्ननलिका अशा वस्तू आत जाण्यासाठी खूप अरुंद आहे. डॉक्टर हसन यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला एन्डोस्कोपिक प्रक्रियेद्वारे काच गुदाशयामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला गेला आहे. परंतु, तो यशस्वी झाला नाही. यामुळे शस्त्रक्रिया करावी लागली आणि रुग्णाला आतड्याच्या आतून हा ग्लास बाहेर काढावा लागला. रुग्णाची प्रकृती आता स्थिर आहे. रुग्ण बरा होण्यास वेळ लागण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तवले आहे. रुग्णाचे पोट काही महिन्यांत बरे होण्याची अपेक्षा आहे. यानंतर त्याचे आतडे सामान्यपणे काम करू लागणार आहेत.

Edited By- Digambar Jadhav

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com