Rohit Pawar ON Ajit Pawar Saam tv
महाराष्ट्र

Rohit Pawar on Ajit Pawar: 'मी शरद पवारांचा नातू असूनही...; अजित पवारांच्या टीकेला रोहित पवार यांचं प्रत्युत्तर

Rohit Pawar News In Marathi: रोहित पवारांची हीच संघर्ष यात्रा अमरावतीत दाखल झाली आहे. रोहित पवार अमरावतीत दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं.

Vishal Gangurde

अमर घटारे, अमरावती

Rohit Pawar Replied Ajit Pawar:

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांची राज्यात युवा संघर्ष यात्रा सुरु आहे. रोहित पवारांची हीच संघर्ष यात्रा अमरावतीत दाखल झाली आहे. रोहित पवार अमरावतीत दाखल झाल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं. 'अजित पवार माझा संघर्ष कसे विसरले? असा प्रति प्रश्न करत रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं. (Latest Marathi News)

दोन दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रोहित पवारांच्या युवा संघर्ष यात्रेवर टीका केली होती. युवा संघर्ष यात्रेवर टीका करताना, हा कसला संघर्ष ? अशा शब्दात अजित पवारांनी रोहित पवारांवर टीका केली होती. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पवार नावाचा व्यक्तिगत फायदा घेतला नाही : रोहित पवार

अजित पवाराच्या टीकेला प्रत्युत्तर देताना अजित पवार म्हणाले, 'माझ्या वडिलांचा साखर कारखाना जेव्हा अडचणीत आला होता. त्यावेळी मी पुढचे शिक्षण न घेता साखर कारखाना अडचणीतून काढण्यासाठी प्रयत्न केला. तेव्हा व्यवसायात आलो. त्यामुळे मला पुढचे शिक्षण देखील घेता आले नाही. मी शरद पवारांचा नातू असूनही पवार या नावाचा कधीही व्यक्तिगत फायदा घेतला नाही'.

'पुणे जिल्हा परिषदेत मी केवळ जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम करत होतो, तर महाविकास आघाडी सरकारमध्ये देखील आमदार म्हणूनच काम करत होतो. माझा हा संघर्ष अजित पवार हे माझे काका असल्याने त्यांनी संपूर्ण बघितला आहे. मात्र ते हा संघर्ष कसे विसरले? असा प्रति प्रश्न करत अजित पवारांच्या टीकेला उत्तर दिलं आहे.

रोहित पवारांचा अजित पवारांना अप्रत्यक्ष टोला

'मी पक्षात कुणाचीही जागा घेत नसून खेळातला तिसरा खेळाडू आहे. पक्षासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. ते काही लोकांना आवडत नाही. धनंजय मुंडे यांनी त्यांच्या काकाला दगा दिला. मात्र, मी माझ्या काकासोबतच आहे, असा अप्रत्यक्ष टोला रोहित पवारांनी अजित पवारांना लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Akash Deep : वडिलांचं छत्र हरपलं, ६ महिन्यांत भावाचाही आधार गेला! कसोटीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आकाश दीपचा संघर्षमय प्रवास

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात 2 पूरबळी; यवतमाळ जिल्ह्याला पावसाने झोडपलं

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

SCROLL FOR NEXT