Dilip Mohite Patil’s meeting with BJP leader Ravindra Chavan fuels speculation of a major political move. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: शेवटी भाजपनं डाव साधला; अजित पवारांचा कट्टर समर्थक फोडला, राष्ट्रवादीचा आमदार हाती घेणार कमळ?

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे. पुण्यात दिलीप मोहिते पाटील यांनी भाजप नेते रवींद्र चव्हाण यांची भेट घेतल्याने चर्चांना उधाण आले आहे.

Bharat Jadhav

  • दिलीप मोहिते पाटील यांच्या भाजप प्रवेशाची शक्यता

  • रवींद्र चव्हाण यांच्यासोबत पुण्यात महत्त्वाची बैठक

  • अजित पवार गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता

भाजप शरद पवार गटानंतर आता अजित पवार गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत आहे. खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची शक्यता आहे. दिलीप मोहिते पाटील हे अजित पवार याचे कट्टर समर्थक मानले जातात. आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आज पुण्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची भेट घेत जवळपास एक तास प्रदीर्घ चर्चा केली. पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप यांच्या कार्यक्रमात चव्हाण नियोजित वेळेपूर्वी पोहोचले होते, त्यावेळीच ही भेट झाल्याची माहिती समोर आली आहे.

पुण्यात झालेल्या या बंद दरवाजाआड बैठकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांचे विश्वासू आणि खंदे समर्थक म्हणून ओळख असलेल्या दिलीप मोहिते पाटील यांनी भाजपच्या प्रदेशाध्यक्षांसोबत इतकी सविस्तर चर्चा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. संजय जगताप यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने झालेल्या या भेटीत आगामी निवडणुका, खेड तालुक्यातील राजकीय समीकरणे आणि पुढील रणनीती यावर चर्चा झाल्याचं समजतंय.

दरम्यान, या घडामोडींमुळे दिलीप मोहिते पाटील यांच्या संभाव्य भाजप प्रवेशाच्या चर्चांना अधिकच जोर मिळाला असून, अजित पवार गटासाठी ही मोठी राजकीय धक्का ठरणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान जिल्हा परिषदेच्या, पंचायत समितीच्या निवडणुकीवेळीच दिलीप मोहिते पाटील हे भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा होती. पक्ष निर्णयात विश्वासात घेतलं जात नसल्यानं आमदार दिलीप मोहिते पाटील नाराज होते.

शरद पवार गटाचे समरजीतसिंह घाटगे यांचा भाजपमध्ये प्रवेश

कोल्हापुरात शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे. समरजितसिंह घाटगे यांनी आज प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. गेल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी घाटगेंनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. मात्र, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आणि अजितदादांच्या निधनानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरण बदल आहे. याची चाहूल लागताच समरजीतसिंह घाटगे यांनी पुन्हा भाजपमध्ये प्रवेश केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांसह संपूर्ण मंत्रिमंडळ बदलणार; संभाव्य तारीख आली समोर, राजकीय घडामोडींना वेग

Maharashtra News Live Update: मंत्रालयात दूषित पाणी प्यायल्यानं सरकारी कर्मचाऱ्यांंना उलट्यांचा त्रास

LPG, Petrol Price: पेट्रोल, डिझेलसह गॅसच्या दरात वाढ होणार? केंद्र सरकारनं दिली स्पष्ट माहिती

BJP Candidate List: मोठी बातमी! विधान परिषदेसाठी भाजपकडून ६ उमेदवारांची घोषणा, कुणाकुणाला मिळाली संधी?

पहलगामची हल्ल्याची मुंबईत पुनरावृत्ती, धर्म विचारून केले चाकूचे वार

SCROLL FOR NEXT