mla babanrao shinde  Saam Tv
महाराष्ट्र

राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदेसह पुत्राची ईडीकडून चौकशी

राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांची ईडीकडून चौकशी झाली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोलापूर : राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे (Baban Shinde) आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे (Ranjit Singh Shinde) यांची ईडीकडून चौकशी (ED Enquiry) झाली आहे. चौकशी झाल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. राज्यात ईडीच्या कारवाया अजून देखील थांबलेल्या नाही. आता मुंबई (Mumbai)- पुण्यानंतर ग्रामीण (Rural) भागात देखील ईडीच्या कारवाया सुरू झाले आहेत. साखर कारखान्यातील शेतकऱ्यांच्या (farmers) नावावर परस्पर कर्ज काढणे. शेतकऱ्यांच्या नावावर उचललेले कर्ज कर्जमाफीत माफ करणे, गिरणी खरेदी याबरोबरच विविध विषयामध्ये ईडीकडून (ED) ३ वेळा चौकशी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

हे देखील पहा-

हे संपूर्ण प्रकरण ५०० कोटींच्या आसपास आहे. राष्ट्रवादीचे (NCP) आमदार बबनराव शिंदे हे शरद पवारांचे निकटवर्तीय मानले जात आहे. आतापर्यंत पिता पुत्राची ३ वेळा चौकशी झाली आहे. सहकार क्षेत्रात आमदार बबनराव शिंदे मोठे वजन देखील आहे. राष्ट्रवादीचे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे कोणत्याही क्षणी जेलमध्ये होणार आहे. ईडीकडे सामाजिक कार्यकर्ते नागनाथ कदम आणि शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी तक्रार केली होती. शेतकऱ्यांचा घामाचा पैसा त्यांना परत मिळवून देणार, वेळ प्रसंगी हायकोर्ट, सुप्रीम कोर्टाविरोधामध्ये (Supreme Court) आवाज उठवणार असे माढ्याचे शिवसेना नेते संजय कोकाटे यांनी सांगितले आहे. महाविकास आघाडी मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेच्या नेत्याने राष्ट्रवादीचे आमदार बबनराव शिंदे यांच्याविरोधामध्ये ईडीकडे तक्रार दिली होती.

आम्ही सर्वजण सत्तेचा गैरवापर करावा या संस्कारात वाढलेले लोक नाही. आज धाड सुरू त्याचे आश्चर्य वाटत नाही. आम्ही चौकशी करत आहे. कोल्हापूरची बातमी आली की विचारतो पाहूणे येऊन गेले का? आम्ही प्रेमाने एकमेकांची चौकशी करत आहोत. त्याचं कारण देखील असे आहे, की स्वातंत्र्यानंतर एजन्सी आणि त्याचा वापर राजकीय विरोधकांना संपुष्टात आणण्यासाठी कधी कुणी केला नव्हता. १० वर्षाअगोदर ईडी हा शब्द माहीत नव्हता. आज ईडी शिवाय काही चालत नाही. आज याच्याकडे उद्या त्याच्याकडे. आता काही लोक निघाले आहेत. आम्ही तुमच्याकडे येणार आहे असे सांगत असतात. हे माहीत असून केंद्र सरकार त्यावर काही करत नाही. म्हणजे या भ्रष्टाचारात केंद्र देखील सहभागी आहे असे कुणी सांगितले तर त्याचे उत्तर त्यांना द्यावे लागणार असा टोला शरद पवारांनी भाजपला लगावला होता.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: दुचाकीवरून ताम्हिणी घाटात गेले, दारू पिण्यावरून वाद; तरुणाने सख्ख्या भावाची केली हत्या

Karisma Kapoor: ३० हजार कोटींसाठी वाद! करिश्मा कपूरला एक्स पतीच्या मालमत्तेतचा किती हिस्सा मिळणार?

Green Bangles Design: श्रावणात महिलांनी हातात घाला हिरव्या बांगड्या, सौंदर्य येईल खुलून

Nirmala Nawale: कारेगावच्या सरपंचबाईंनी केली पहिल्या श्रावणी सोमवारची पूजा; PHOTO पाहा

Dharashiv : शेतात काम करताना अनर्थ घडला; तीन चिमुकल्या झाल्या पोरक्या, गावाने उचलली मुलींची जबाबदारी

SCROLL FOR NEXT