Devendra Fadnavis  Saam tv
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : 'मंत्र्यांनो, मस्ती कराल तर घरी जाल'; मुख्यमंत्री फडणवीसांचा मंत्रिमंडळाला दम, VIDEO

Devendra Fadnavis News : पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री फडणवीसांना दिलेल्या कानमंत्रामुळे मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटेंचे धाबे दणाणले आहेत..मात्र मोदींनी नेमका फडणवीसांना कोणता कानमंत्र दिलाय? आणि फडणवीसांनी मंत्र्यांना दम का भरलाय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये...

Tanmay Tillu

महायुतीच्या सरकारचं प्रशासन स्वच्छ असावं. राज्य करताना कोणाचीही पर्वा करू नका, असे आदेश पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेत. पंतप्रधान मोदींच्या या आदेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांचं धाबं दणाणलंय. दिल्लीतील शपथविधी सोहळ्यात पंतप्रधान आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये राजकीय चर्चा रंगली. त्याच चर्चेचा तपशील आता समोर आलायं....मोदींनी फडणवीसांना काय सूचना केल्यात पाहूया...

मोदींकडून फडणवीसांना फ्री हँड?

राज्यातील प्रशासन स्वच्छ ठेवा

प्रशासनात पारदर्शकता, प्रामाणिकता आणि शिस्त आणा

स्वच्छ प्रशासनासाठी कोणाचीही पर्वा करू नका

पंतप्रधान मोदींनी सर्व मंत्र्यांसोबत साधलेल्या संवादातही याबाबत कडक सूचना केल्याची माहिती शिंदे गटाच्या मंत्र्यांनी दिलीय. त्यामुळे सर्वच मंत्री सतर्क झाले आहेत. 'पंतप्रधानांच्या मंत्र्यांना कडक सूचना', असे सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट म्हणाले.

याचीच अंमलबजावणी करण्यासाठी फडणवीसांनी काही कडक पावलं उचलली आहेत. मस्ती कराल तर घरी जाल असा इशाराच मुख्यमंत्री फडणवीसांनी दिल्याचं स्वत: कृषीमंत्री माणिकराव कोकाटेंनी सांगितलंय. आणि त्यामुळेच मंत्र्यांचे वैयक्तिक सचिव आणि ओएसडीसुद्धा फडणवीस ठरवतात असंही कोकाटेंनी म्हटलंय.

कोकाटेंनी केलेल्या या गौप्यस्फोटावर फडणवीसांनी शिक्कामोर्तब केलंय. कोणत्याही फिक्सर ओएसडी आणि पीएसना मंत्र्यासोबत थारा नसेल अशी स्पष्ट भूमिका फडणवीसांनी मांडलीय. मंत्र्यांचा पीएस आणि ओएसडी कोण असावा हे ठरवण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असतात असंही त्यांनी माणिकराव कोकाटेंनी ठणकावून सांगितलंय.

मुख्यमंत्र्यांच्या या रोखठोक भूमिकेमुळे अनेक मंत्र्यांची अडचण झाल्याचं दिसतंय. अशीच भूमिका आता घोटाळे आणि इतर गंभीर आरोपांबाबत फडणवीस घेणार का? अशी कठोर भूमिका घेतलीच तर अन्न व नागरी पुरवठामंत्री धनंजय मुंडे आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची विकेट जाणार का ? याबाबत सर्वांची उत्सुकता आता ताणली गेलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shubman Gill : गिल दा मामला...! मँचेस्टर कसोटीत शुभमन गिलचे शतक, कॅप्टनने अनेक रेकॉर्ड मोडले

Gold Price: सोन्याची उसळी! सोन्याचा दर लवकरच 1 लाख 10 हजारांवर जाणार

Shivani Rangole: टिव्हीतल्या 'मास्तरीणबाई' चं सौंदर्य लाखात एक, फोटोंवर लाईक्स

Maharashtra Live News Update: खराडी पार्टीवर केलेली कारवाई राजकीय दृष्टिकोनातून करण्यात आली नाही ना? - रोहित पवार

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT