Manikrao Kokate :आधी २ वर्षे शिक्षा, काही तासांनी जामीन; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंना जामीन

Agriculture Minister Manikrao Kokate granted bail : कागदपत्र फेरफार आणि फसवणुकीच्या गुन्ह्यात कोर्टाकडून माणिकराव कोकाटे यांना २ वर्षे शिक्षा सुनावण्यात आली होती. काही तासांनीच कोकाटेंना जामीन देण्यात आला.

Manikrao Kokate gets bail : सन १९९५ साली कागदपत्रांच्या फेरफार आणि फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात कृषिमंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने २ वर्षांची शिक्षा सुनावली. त्यानंतर काही तासांनीच कोकाटे यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला. त्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील यांच्याविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. सन १९९५ ते ९७ या काळात सरकारच्या १० टक्के कोट्यातून कमी उत्पन्न दाखवून घर घेतल्याचा आरोप त्यांच्यावर होता. तत्कालीन अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी करून सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांनी यासंदर्भात याचिका दाखल केली होती. कागदपत्रांमध्ये फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. मागील अनेक वर्षांपासून नाशिक जिल्हा न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी सुरू होती. न्यायालयाने कोकाटे आणि त्यांचे बंधू सुनील यांना दोन वर्षांचा कारावास आणि ५० हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली होती. काही वेळानंतर कोकाटेंनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com