sunil tatkare  Saam tv
महाराष्ट्र

कोकणातून तटकरेंच्या मुलाची बिनविरोध निवड; महायुतीत खदखद, शिंदेसेनेची फरफट

raigad news : रायगडमध्ये अनिकेत तटकरेंची बिनविरोध निवड झालीय..मात्र रायगडमध्ये तटकरेचं वाढतं वर्चस्व शिंदेसेनेत अस्वस्थता निर्माण करतयं...कोकणात शिंदेसेना राष्ट्रवादीपुढे कशी हतबल झालीय...आणि शिंदेसेनेचे आमदार दळवींनी कोणता मोठा दावा केलाय. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

रायगडमध्ये तटकरे आणि शिंदेसेनेचं विळा-भोपळ्याचं नातं साऱ्या राज्याला परिचित आहे. असं असूनही राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंनी शिंदेसेनेचं कोकणात वर्चस्व असूनही मुलासाठी उमेदवारी खेचून आणली. एवढंच नव्हे तर मुलगा अनिकेत तटकरेंना बिनविरोध निवडूनही आणलं. आता तटकरेंच्या कुटुंबात खासदार, मंत्रिपदासह आता आमदारकीही आलीय.

तटकरेंनी पालकमंत्रिपदाबाबत समन्वयानं निर्णय घेतला जाणार असल्याचं मोघम उत्तर दिल्यामुळे शिंदेसेनेच्या पदरात काय पडणार हा प्रश्नच आहे. तटकरेंच्या या गुगली राजकारणापुढे रायगड जिल्ह्यातील शिंदेसेना पुरती हतबल झाल्याचे चित्र आहे. महायुतीमध्ये शिंदेसेनेची फरफट होत असल्यानं, अखेर शिंदेसेनेचे आमदार महेंद्र दळवींनी खदखद मांडलीय... निवडणुक लढवली असती तर शेकापप्रमाणे तटकरेंच्या राजकारणाचा अंत झाला असता, असं मोठं विधान दळवींनी केलयं.

मुळात कोकणात शिंदेसेनेचं संख्याबळ सर्वाधिक आहे... त्यामुळे विधानपरिषदेच्या जागेसाठी विकास गोगावले आग्रही असल्याची चर्चा होती... मात्र राष्ट्रवादीनंही या जागेवर दावा केला... ज्यानंतर महेंद्र दळवींची मुलगी जुईली दळवी मैदानात उतरल्या. मात्र तटकरेंनी सूत्र फिरवली आणि वरिष्ठांच्या सूचनेनुसार दळवींनी माघार घेतली.

गेल्या काही महिन्यांपासूनच्या घडामोडी बघितल्या तर वेळोवेळी तटकरेंनी शिंदेसेनेला मात दिल्याचं दिसतं. भरत गोगावले मंत्री असूनही गेली दोन वर्षे सुनील तटकरेंच्या विरोधामुळे त्यांना रायगडचे पालकमंत्रिपद मिळू शकलेले नाही. जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदेसेनेचे सर्वाधिक सदस्य निवडून आले, तरीही तटकरेंनी भाजपला सोबत घेऊन शिंदेसेनेला अध्यक्षपदापासून दूर ठेवल्याची चर्चा आहे..

त्यात म्हसळा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष आणि नगरसेवक राष्ट्रवादी सोडून शिंदेसेनेत आले.. मात्र तटकरेंनी अवघ्या 4 दिवसांत आपलं राजकीय वजन वापरून त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडल्याची चर्चा आहे...

त्यामुळे कोकणात तटकरे कुटुंबियाचं वाढती राजकीय ताकद शिंदेसेनेसाठी डोकेदुखी ठरतेय... एकाच घरात आमदार, खासदार आणि मंत्रीपद अशी सत्तेतील महत्त्वाची पद असल्यानं तटकरेचं वजन जिल्ह्यात वाढलयं... त्यामुळे येत्या काळात शिंदेसेना आणि राष्ट्रवादीत पालकमंत्री पदावरून मोठा संघर्ष पेटला तर तटकरे माघार घेणार की शिंदेसेना याबाबत उत्सुकता असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

इंडिया आघाडीला मोठा धक्का; ३० खासदार असलेल्या पक्षाने फिरवली महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ

TMC Crisis: ममता बनर्जींना आणखी एक जबर धक्का; तब्बल २० खासदार पक्ष सोडण्याच्या तयारीत

Rain Alert : १९ राज्यांना वादळी वाऱ्यांसह पाऊस झोडपून काढणार, ८० किमी वेगाने वाहणार वारे; हवामान खात्याचा इशारा

Podi Idli Recipe: सकाळी नाश्त्यासाठी झटपट घरच्या घरी बनवा टेस्टी पोडी इडली, वाचा सोपी रेसिपी

Kolhapur : गावी नवीन घर बांधलं, ८ दिवस राहिले; दुसऱ्या गावी जाताना घडला भीषण अपघात, मुंबईतील एकाच कुटुंबातील चौघांचा करुण अंत

SCROLL FOR NEXT