saam tv
महाराष्ट्र

Sharad Pawar: विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करा हे मी मोदींना सांगितलं होतं: शरद पवार

Sharad Pawar On Dharmendra Pradhan Resignation : शरद पवार यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्याचा सल्ला त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला होता. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी हे वक्तव्य केले आहे.

Bharat Jadhav

  • विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करण्याबाबत शरद पवारांचे वक्तव्य

  • लाठीचार्जबाबत शरद पवारांची प्रतिक्रिया

  • विद्यार्थी आंदोलनावर शरद पवारांचा मोठा दावा

नवीन पिढीच्या आंदोलनाला हाताळण्यासाठी लाठीचार्ज करण्याची गरज नव्हती. विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करा, असं आपण पंतप्रधान मोदींना सांगितलं होतं, असा दावा शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत केलाय. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला होता. पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवार म्हणाले की, युवकांनी सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडले असे मोठे वक्तव्य केले आहे. युवकांनी संयमाने भावना मांडल्या.

युवकांनी भावना देशाच्या नेतृत्वासाठी मांडल्या असंही ते म्हणाले. देशातील लोकशाहीने या निमित्त कात टाकली आहे. तसेच शरद पवारांनी मागण्या ऐका असं मोदींना भेटीत सांगितलं होतं. नव्या पिढीला हाताळताना लाठीमार गरजेचा नव्हता. त्यामुळे हे आंदोलन देशाच्या बाहेरपर्यंत गेल्याचं सांगितल्याचं पवार म्हणाले.

'मी मोदीना सांगितलं डायलॉग सुरु करा आणि पोलीस यंत्रणा वापरू नका, मला वाटतेय मी जे बोललो त्याची त्यांनी नोंद घेतली असावी. परंतु युवा शक्ती एकत्र आली. देशाच्या कानकोपऱ्यातून आली याची जाणीव झाली त्यामुळे राजीनामा घेतला असावा किंवा शिक्षणमंत्र्यांनी दिला असावा. आरोपीमध्ये महाराष्ट्रातील आरोपी आहे मान खाली घालावी लागत होती. मी मोदींना भेटलो, प्रश्न सुटायला मदत झाली की नाही? माहिती नाही. दरम्यान राजीनामा घेणार नाही हे मलाही सांगितल होते शेवटी घेतला, असं शरद पवार म्हणालेत.

कॉक्रोच जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि विद्यार्थ्यांच्या ३७ दिवसांच्या आंदोलनानंतर धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. दरम्यान धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामागील स्टोरी सर्वांसमोर आलीय. यासाठी आपल्याला दिल्लीमधील राजकीय घडामोडी आठवाव्या लागतील. दिल्लीच्या जंतरमंतरवर विद्यार्थ्यांचं आंदोलन पेटलं होतं.

त्यावेळी दिल्लीमध्ये एक मोठी घडमोड झाली होती. ती म्हणजे शरद पवार आणि खासदार सु्प्रिया सुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांच्यात आंदोलनासंदर्भात चर्चा झाली. यात शरद पवार यांनी मोदींना विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य कराव्यात असा सल्ला दिला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: देशातून अजून क्रांतीची ठिणगी विझलेली नाही - ठाकरे

Kanjivaram Paithani Saree: लग्नसमारंभ, कार्यक्रमात उठून दिसायचंय? मग एकदा पाहाच या ७ सुंदर कांजीवरम पैठणी साड्या

Jagannath Rath Yatra : जग्गनाथपुरी यात्रा चेंगराचेंगरीने घेतला आणखी १ बळी, मृतांची संख्या ४ वर; १०० हून अधिक भाविक रूग्णालयात दाखल

Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस हे नवे शिक्षण मंत्री होणार; संजय राऊतांच्या दाव्यानं खळबळ

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीत पोहोचले, चर्चांना उधाण

SCROLL FOR NEXT