Alisha Khedekar
तांदूळ हा भारतीय आहाराचा महत्त्वाचा भाग आहे. मात्र आरोग्याच्या गरजेनुसार तांदळाची निवड केल्यास आहार अधिक संतुलित ठेवता येतो.
ब्राउन राईसमध्ये फायबर अधिक असते. त्यामुळे पचन हळू होते आणि रक्तातील साखरेची वाढ तुलनेने नियंत्रित राहण्यास मदत होऊ शकते.
हृदयाच्या आरोग्यासाठी संपूर्ण धान्यांचा आहार उपयुक्त ठरू शकतो. ब्राउन राईस हा फायबरयुक्त पर्याय म्हणून निवडता येतो.
लाल तांदळात फायबर आणि काही पोषक घटक असतात. त्यामुळे पोट भरल्यासारखे वाटण्यास मदत होऊन वजन नियंत्रणासाठी तो उपयोगी ठरू शकतो.
हातसडीच्या तांदळावर तुलनेने कमी प्रक्रिया होते. त्यामुळे तांदळातील काही नैसर्गिक पोषक घटक आणि फायबर टिकून राहतात.
आहारातील फायबरचे प्रमाण वाढवणे कोलेस्ट्रॉल व्यवस्थापनासाठी फायदेशीर ठरू शकते. त्यामुळे पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राउन राईस विचारात घेता येतो.
सदर माहिती सामान्य ज्ञानावर असून योग्य माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा