Sharad Pawar On Suspension Of MP Saam Digital
महाराष्ट्र

Sharad Pawar On Suspension Of MP: संसदेतील प्रकरण चिंता वाढवणारं, शरद पवारांनी उपराष्ट्रपतींना लिहिलं पत्रं, त्या घटनेचा उल्लेख करत म्हणाले...

Sharad Pawar Parliament Attack: केंद्र सरकारने या प्रकरणावार खुलासा तर केलाच नाही उलट तशी मागणी करणाऱ्या खासदारांच निलंबन करण्यात आलं. सरकारची ही भूमिका खेदजनक असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.

Sandeep Gawade

Sharad Pawar On Suspension Of MP

२००१ मध्ये संसदेवर ज्या दिवशी हल्ला झाला त्याच दिवशी सुरक्षा भेदत संसदेत घुसखोरीची घटना घडली. हे चिंताजनक आहे. एका खासदाराने दिलेल्या पासवर त्या घुसखोरांनी संसदेत प्रवेश केला आणि पुढे प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उड्या मारत स्मोक कँडल फोडण्यात आले. या प्रकरणाचं गांभीर्य पाहता संसद सदस्यांनी सरकारकडे खुलासा मागणं हे नैसर्गिक आहे. केंद्र सरकारने भूमिका स्पष्ट करणं आवश्यक होतं, असं पत्रच शरद पवार यांनी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांना लिहिलं आहे.

केंद्र सरकारने या प्रकरणावार खुलासा तर केलाच नाही उलट तशी मागणी करणाऱ्या खासदारांच निलंबन करण्यात आलं. सरकारची ही भूमिका खेदजनक असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. तसचं अशा प्रकारच्या घटनांसंदर्भात सरकारकडे स्पष्टीकरण मागण्याचा अधिकार खासदारांना आहे. त्यामुळे निलंबनाची कारवाई म्हणजे संसदेच्या निष्पक्षतेच्या तत्वाला विरोध असल्यांचं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

संसदेतील घुसखोरी प्रकरणावरून दिल्लीतील राजकीय वातावरण तापलं आहे. लोकसभेच्या सभागृहात स्मोक कॅन्डलच्या घटनेवर संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ पहायला मिळाला. त्यानंतर दोन्ही सभागृहातील तब्बल १४१ खासदारांना निलंबित करण्यात आलं आहे. विरोधी पक्षांच्या खासदारांकडून निषेध केला जात असतानाच पवारांनी उपराष्टपतींना पत्र लिहून नाराजी व्यक्त केली आहे.

संसद प्रकरणावरून सभागृहात झालेल्या गोंधळात ते सहभागी नव्हते त्यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे संसदीय कामकाज पद्धती आणि लोकशाही मूल्य अबाधित रहावी यासाठी आपण लक्ष घालावं, अशी मागणी शरद पवार यांनी उपराष्ट्रपतींकडे केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी; गर्दी मराठी भाषेवरच्या अन्यायाविरोधातील, वरळीतल्या ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची

SCROLL FOR NEXT