Sharad Pawar On Chhagan Bhujabal Saam tv
महाराष्ट्र

Sharad Pawar On Chhagan Bhujabal: '...तर भुजबळ तुरुंगात गेले असते', शरद पवारांचं तेलगी प्रकरणावर मोठं विधान

Sharad Pawar Meeting: जिल्हाध्यक्षांच्या बैठकीमध्ये शरद पवार यांनी हे वक्तव्य केले आहे.

Priya More

Mumbai News: 'तेलगी घोटाळा प्रकरणात (Telgi Scam Case) शरद पवारसाहेब तुम्ही माझा राजीनामा का घेतला?', असा सवाल करणाऱ्या राज्याचे मंत्री आणि अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ (Ministar Chhagan Bhujabal) यांना शरद पवारांनी प्रत्युत्तर दिले आहे. 'तेव्हा राजीनामा घेतला नसता तर भुजबळ तुरुंगात गेले असते', असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले. जिल्हाध्यक्षांच्या बैठकीमध्ये शरद पवार यांनी हे वक्तव्य केले आहे.

शरद पवारांनी या बैठकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना देखील महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. 'कोणताही संभ्रम ठेवू नका. लढायला लागा. अजित पवार गट माझ्यावर टीका करत आहे. पण त्यांना कोण समजवणार. त्यांच्याकडे लक्ष देऊ नका.' असा महत्वाचा सल्ला त्यांनी जिल्हाध्यक्षांना या बैठकीमध्ये दिला.

२७ ऑगस्टला बीडमध्ये कृषीमंत्री धनंजय मुंडे यांची सभा पार पडली. या सभेमध्ये बोलताना छगन भुजबळ यांनी थेट शरद पवारांवर निशाणा साधला होता. 'साहेब तुमच्यावर देखील आरोप झाले होते. १९९२-९२ आणि ९४ मध्ये तुमच्यावर आरोप झाले होते. तुमचा राजीनामा कुणी मागितला नाही आणि तुम्हीही तो दिला नाही. पण छगन भुजबळचा राजीनामा तुम्ही का घेतला?', असा सवाल छगन भुजबळांनी शरद पवारांना विचारला होता.

त्यासोबत त्यांनी पुढे असे देखील सांगितले होते की, 'मी राजीनामा दिल्यानंतर बऱ्याच गोष्टी घडल्या होत्या. एक दिवस पोलीस आयुक्त आले आणि म्हणाले की समीर भुजबळला अटक होणार आहे. ताबडतोब त्याला देशाच्या बाहेर काढा. आम्ही संध्याकाळी त्याला देशाच्या बाहेर पाठवलं. काय चाललं होतं नक्की? याप्रकरणी शेवटी आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो.'

'सुप्रीम कोर्टाने सांगितले की ही केस सीबीआयकडे द्या. सीबीआयनं एक शब्दसुद्धा आमच्याविरुद्ध त्या चार्जशीटमध्ये म्हटलेला नाही. त्यात माझं नावसुद्धा नाही. मग साहेब आमची काय चूक होती ते सांगा.', असा देखील सवाल त्यांनी पवारांना विचारला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nag panchami 2025: यंदा नाग पंचमी कधी आहे? जाणून घ्या

Milk And Curd: दूध आणि दही एकत्र खाल्ले तर काय होते?

Pune Rave Party: खराडीतील रेव्ह पार्टीपूर्वी आरोपींची आणखी २ ठिकाणी पार्टी, तपासातून धक्कादायक माहिती उघड

Maharashtra Live News Update: उद्धव ठाकरे यांच्या जन्मदिनानिमित्त सोलापुरात पार पडलं महाआरोग्य शिबीर

पावसात लहानग्यांचे आरोग्य जपण्यासाठी घ्या 'ही' खबरदारी

SCROLL FOR NEXT