Kishori Pednekar News: बॉडी बॅग खरेदी घोटाळा प्रकरण, किशोरी पेडणेकरांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

body bag purchase scam case: गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी कोर्टात धाव घेतली होती. पण त्यांना दिलासा मिळाला नाही.
Kishori Pednekar
Kishori PednekarSaam tv
Published On

सचिन गाड, मुंबई

Mumbai News: मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Ex Mayor Kishori Pednekar) यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा नाहीच. किशोरी पेडणेकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने (Bombay Sessions Court) फेटाळला. मुंबईत कोरोना काळामध्ये (Corona News) डेड बॉडी बॅग खरेदीचा भ्रष्टाचार झाला होता. याप्रकरणी किशोरी पेडणेकरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी कोर्टात धाव घेतली होती. पण त्यांना दिलासा मिळाला नाही.

Kishori Pednekar
Kalyan Political News: दहीहंडी कुणाची फुटणार? कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा आमनेसामने

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी कोरोना काळात मुंबई महापालिकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. किशोरी पेडणेकर यांच्यावर बॉडी बॅग खरेदीत घोटाळा केल्याचा आरोप करण्यात आला होता. याप्रकरणी किशोरी पेडणेकर यांच्याविरोधात मुंबईतील आग्रीपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. किशोरी पेडणेकर यांच्यासोबतच बीएमसीच्या दोन अधिकाऱ्यांविरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Kishori Pednekar
Mumbai Mantralaya News: अप्पर वर्धा धरणग्रस्तांचं मंत्रालयात घुसून आंदोलन, दुसऱ्या माळ्यावरून संरक्षण जाळीवर मारल्या उड्या

मुंबईत मृत कोरोना रुग्णांना वाहून नेण्यासाठी वापरण्यात येणारी बॉडीबॅग २००० रुपयांऐवजी ६,८०० रुपयांना खरेदी केल्याचं ईडीने (ED) म्हटलं आहे. हे कंत्राट तत्कालीन महापौरांच्या सूचनेनुसार देण्यात आल्याचा आरोप ईडीने केला होता. कोविड काळात किशोरी पेडणेकर याच मुंबईच्या महापौर होत्या. त्यामुळे याप्रकरणी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

Kishori Pednekar
Sunny Deol Breaks Silence: सनी देओल ५० कोटी मानधन घेण्याच्या चर्चेवरून इंडस्ट्रीत 'गदर रिटर्न्स', शेवटी स्वतःलाच खरं काय ते सांगावं लागलं

बॉडी बॅग खरेदीत घोटाळा प्रकरणात किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढतच चालल्या आहेत. या प्रकरणात त्यांना अद्याप दिलासा मिळाला नाही. त्यातच कोर्टाने देखील त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घोटाळा प्रकरणात ईडीने महापालिकेच्या काही अधिकाऱ्यांच्या घरी छापेमारी देखील केली होती.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com