Kalyan Political News: दहीहंडी कुणाची फुटणार? कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा आमनेसामने

Kalyan Political News In Marathi: कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा आमनेसामने आले आहेत.
Kalyan Political News:
Kalyan Political News:Saam tv
Published On

अभिजीत देशमुख

Kalyan Latest Political News In Marathi:

कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गट पुन्हा आमनेसामने आले आहेत. दहीहंडी उत्सवाच्या परवानगीवरून दोन्ही पक्षात वादाची ठिणगी पडली आहे. दहहंडीसाठी पोलिसांनी शिंदे गटाला परवानगी दिल्याने ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. (Latest Marathi News)

कल्याणमध्ये दहीहंडी उत्सवाच्या परवानगीवरून शिंदे गट आणि ठाकरे गटात वाद निर्माण झाला आहे. कल्याणमध्ये दहीहंडी उत्सवाच्या परवानगीवरून शिंदे गट आणि ठाकरे गट एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले आहेत.

Kalyan Political News:
Mumbai Mantralaya News: अप्पर वर्धा धरणग्रस्तांचं मंत्रालयात घुसून आंदोलन, दुसऱ्या माळ्यावरून संरक्षण जाळीवर मारल्या उड्या

छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात दहीहंडी उत्सवाला परवानगीसाठी शिवसेनेच्या शिंदे गट आणि ठाकरे गटाने पोलिसांकडे मागणी केली. त्यानंतर पोलिसांनी शिवसेनेच्या शिंदे गटाला परवानगी दिली. यानंतर ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली.

दरम्यान, ठाकरे गटाचे शहर प्रमुख यांनी या घडामोडींवर भाष्य केलं आहे. 'शहर प्रमुख या नात्याने या उत्सवाचे परवानगी मागितली, मात्र पोलीस राजकीय दबावाला बळी पडलेत. सण उत्सवांमध्ये देखील राजकारण आणले जात आहे. राजकीय दबावापोटी शिंदे गटाला परवानगी देण्यात आली, लवकरच याबाबत पक्ष भूमिका घेईल, असे शहर प्रमुख सचिन बासरी यांनी सांगितले.

तर शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख रवी पाटील यांनी सांगितले की, शिवसेनेतर्फे हा उत्सव पंधरा वर्षापासून साजरा केला जातो, त्याच शिवसेनेत आम्ही आहोत. आम्ही कुणावरही दबाव आणून परवानगी मागितली नाही. विनाकारण प्रशासनावर आरोप करून कारण नसताना प्रसिद्धी मिळवण्याचा आरोप कोणी करू नये. हा उत्सव धार्मिक आहे, यात आम्ही राजकारण केलं नाही'.

Kalyan Political News:
Mla Narendra Bhondekar : शिंदे गटाचा आमदार हिवाळी अधिवनेशात विधीमंडळावर मोर्चा काढणार, काय आहेत मागण्या?

'शिवसेनेला निवडणूक आयोगाने मान्यता दिली. पक्ष शहर प्रमुख म्हणून सण उत्सवाच्या परवानगी मिळवणे हे माझं काम आहे आणि ते मी केलं. शिवसैनिक म्हणून उत्सहात सहभागी व्हावं उगाच मालकी हक्क सांगू नये, असेही ते पुढे म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com