Rohit pawar
Rohit pawar  saam tv
महाराष्ट्र

... तर सर्वात जास्त आमदार राष्ट्रवादीचे निवडून येतील; रोहित पवारांनी व्यक्त केला विश्वास

सचिन अगरवाल

अहमदनगर : 'निवडणुका लागल्या तर लढावे लागतीलच. मात्र, निवडणुका लागू नये त्यासाठी सर्वांनीच प्रयत्न केले पाहिजे. तसेच एखाद्या विषय चिघळल्यानंतर तो कोर्टात गेला तर निवडणुका घ्याव्याच लागतील, त्यावेळी सर्वात जास्त आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडून येतील असा विश्वास रोहीत पवार (Rohit Pawar) यांनी व्यक्त केला आहे. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सध्या कर्जत दौऱ्यावर आहेत. त्यावेळी ते माध्यामांशी बोलत होते. (Rohit Pawar News In Marathi)

रोहित पवार सध्या कर्जत दौऱ्यावर असून त्यांनी यावेळी आमदार राम शिंदे यांच्यावरही जोरदार टीका केली. रोहित पवार पुढे म्हणाले, 'राम शिंदे यांच्या आमदारकीमुळे तालुक्याला फायदा होत असेल तर चांगली गोष्ट आहे. मात्र ज्या पद्धतीने ते दहा वर्षांमध्ये वागले, त्याप्रमाणे तालुक्याचा विकास व्हायला पाहिजे होता तो झाला नाही'.

रोहित पवार पुढे म्हणाले, 'राम शिंदे (Ram Shinde) यांना मंत्रीपद असताना देखील अनेक गोष्टी प्रलंबित राहिल्या. आता देखील विकास काम होऊ नये यासाठी प्रयत्न करणार असतील तर ते योग्य नाही. तसेच माझ्या दोन्ही तालुक्यात अन्याय झाला तर ते मी खपून घेणार नाही'.

माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) शिवसेनेच्या आमदारांना निधी दिला नाही या आरोपांवर देखील रोहित पवारांनी उत्तर दिलं. आरोप करणारे आरोप करतात, मात्र निधीचं वाटप कशाप्रकारे केलं हे अजित पवारांनी सांगितला आहे. ते नाराज आहे असं दाखवत असले तरी त्यांना मोठ्या प्रमाणात निधी गेला असल्याचं रोहित पवारांनी म्हटलं.

'मी त्यांचा विरोध करतो असं नाही, मात्र बंडखोर आमदारांना निधी मिळाला हा आरोप योग्य नाही. त्यात वेगळी कारण असतील ते जनतेसमोर आलं पाहिजे. उगाच एखाद्या पक्षावर खापर फोडणे हे योग्य नाही, असा सल्ला रोहित पवार यांनी आरोप करणाऱ्यांना दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Swati Maliwal : सीएम केजरीवाल यांच्या घराबाहेरील CCTV समोर; महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत दिसल्या स्वाती मालीवाल

Today's Marathi News Live: मुलुंड राडा प्रकरण : ५ शिवसैनिकांना अटक

Uddhav Thackeray: इंडिया आघाडी सत्तेत आल्यास तुम्ही पंतप्रधान बनणार का? उद्धव ठाकरे म्हणाले, 'आमचं ठरलंय की...'

Chess Playing Benefits: बुद्धिबळ खेळण्याचे जाणून 'घ्या' फायदे

अमरावती : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा पांढरा कांदा झाला काळा; चांदूर बाजार तालुक्यात सर्वाधिक नुकसान

SCROLL FOR NEXT