Ajit pawar group worker end life Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याची धावत्या ट्रेनसमोर आत्महत्या; धनंजय मुंडेंचा निकटवर्तीय असल्याची माहिती

NCP Ajit Pawar Group: अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याने अकोल्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक बातमी आहे. धावत्या ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवलं. हा पदाधिकारी धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय होता.

Priya More

Summary -

  • राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याची अकोल्यात आत्महत्या

  • अकोल्यात राष्ट्रवादी विद्यार्थी आघाडीचे महानगरप्रमुख वैभव घुगे यांची आत्महत्या

  • धावत्या ट्रेनसमोर उडी मारून केली आत्महत्या

  • ते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय कार्यकर्ते होते

अकोल्याच्या राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे. अकोल्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याने आत्महत्या केली. धावत्या ट्रेनसमोर उडी मारत त्याने आयु्ष्य संपवलं. हा पदाधिकारी आमदार धनंजय मुंडे यांच्या जवळचा कार्यकर्ता होता अशी देखील माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पोलिस सध्या या आत्महत्या प्रकरणाचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीचे अकोला महानगरप्रमुखाने आत्महत्या केली. वैभव घुगे असे आत्महत्या केलेल्या पदाधिकाऱ्याचे नाव होते. अकोल्यातील जुन्या आरटीओ रोडवरील रेल्वे ट्रॅकवर रेल्वेसमोर उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली. वैभव घुगे हे राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्या जवळचे कार्यकर्ते होते.

वैभव घुगे यांच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आले नाही. मात्र, वैभव घुगेंनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली असल्याची प्राथमिक माहिती सुत्रांनी दिली आहे. वैभव घुगेंच्या आत्महत्येने अकोल्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे.

वैभव घुगे यांच्या आत्महत्येमुळे कुंटुंबीयांना मोठा धक्का बसला. पोलिस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. सध्या पोलिसांच्या समोर या आत्महत्येमागचं खरं कारण शोधण्याचे मोठं आव्हान असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Railway Jobs: रेल्वेत सर्वात मोठी भरती! २१९९७ रिक्त पदे; अर्ज करण्याची मुदत वाढवली, शेवटची तारीख काय?

Maharashtra Live News Update : खग्रास चंद्रग्रहणामुळे आज साडेतीन तास साईदर्शन राहणार बंद

Rashmika-Vijay Sangeet : एकमेकांच्या मिठीत हरवले रश्मिका-विजय; VIROSH चा रोमँटिक डान्स पाहिलात का? संगीत सोहळ्याचे फोटो आले समोर

Early symptoms of kidney failure: कंबरदुखी, सतत लघवी होणं आणि...! शरीरातील हे संकेत सांगतात किडनी खराब झालीये

Gold Price Today: गुड न्यूज! सोनं ४९०० रुपयांनी स्वस्त, २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर किती?

SCROLL FOR NEXT