Baba Siddique Death Latest News: Saamtv
महाराष्ट्र

Baba Siddique Death: बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात खळबळजनक ट्वीस्ट! 'त्या' फेसबुक पेजचे अकोला कनेक्शन समोर; धागेदोरे पुण्यापर्यंत

Baba Siddique Death Latest News: बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणाऱ्या फेसबुक पोस्टची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. शुबू लोणकर या अकाउंटवरुन ही पोस्ट करण्यात आली आहे.

Gangappa Pujari

अक्षय गवळी, अकोला

Baba Siddique Death Akola Connection: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते, माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची मुंबईमध्ये हत्या करण्यात आली. या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोई गँगने स्वीकारली आहे. शुबू लोणकर या फेसबूक अकाउऊंटवरुन पोस्ट करत याबाबतची माहिती देण्यात आली आहे. मात्र या प्रकरणात आता नवीन ट्वीस्ट आला असून या प्रकरणी अकोला कनेक्शन समोर आले आहे. जबाबदारी घेतल्याची पोस्ट शेअर केलेला शुबू हा शुभम रामेश्वर लोणकर आहे का? याचा तपास केला जात आहे.

जबाबदारी घेतलेले फेसबुक पेज कोणाचे?

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणाऱ्या फेसबुक पोस्टची केंद्रीय यंत्रणांकडून चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. शुबू लोणकर या अकाउंटवरुन ही पोस्ट करण्यात आली आहे. शुबू लोणकर ज्यांचे हे फेसबुक हँडल आहे, त्याचे खरे नाव शुभम लोणकर असू शकते. असा अंदाज वर्तवला जात आहे. शुभम लोणकर हा मूळ अकोला जिल्ह्यातील अकोट येथील रहिवासी असल्याचे समजते. या आधीही शुभम लोणकर ला अकोला पोलिसांनी कारवाई करत तब्बल तीन पिस्टल त्याच्याकडून जप्त केल्या होत्या..

अकोल्यातील तरुण रडारवर

शुभम लोणकर संदर्भात अकोला पोलिसांना विचारले असता, आपण त्याच्यावर फेब्रुवारी महिन्यात कारवाई केल्याचं पोलिसांनी म्हटलं होते. मात्र आज फेसबुक पोस्ट करणारा शुबू लोणकर आणि शुभम लोणकर हाच एकच का? हे अद्याप कळू शकले नाही, त्यामुळं आपण याबद्दल जास्त सांगू शकणार नाही, अशी माहिती अकोला पोलिसांचे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांनी दिली आहे.

कोण आहे शुभम लोणकर?

लॉरेन्स बिश्नोई आणि त्याचा लहान भाऊ अनमोल बिश्नोई यांच्या संपर्कात असणाऱ्या शुभम लोणकरला बंदुकीच्या तस्करी प्रकरणात अकोला पोलिसांनी गजाआड केले होते. शुभम हा बंदूक तस्करीचा मुख्य सूत्रधार असल्याचं समजलं होते. अकोट पोलिसांनी त्याच्याकडून बंदूक खरेदी करणाऱ्या तिघांना बेड्या ठोकल्या आहेत. शुभम हा मूळ अकोला जिल्ह्यातील अकोटचा रहीवासी आहे. 'तो' गेल्या अनेक दिवसांपासून पुण्यातील वार्जे शहरात रहायचा, अकोट शहर पोलिसांनी शुभलला पुण्यातून ताब्यात घेतलं होते. त्याची या प्रकरणी जामिनावर सुटका झाली होती.

पुण्यापर्यंत धागेदोरे..

दरम्यान, बाबा सिद्दीकी यांच्या हत्ये पुणे कनेक्शनही समोर आले आहे. धर्मराज कश्यप या व्यक्तीने बाबा सिद्दिकींवर गोळीबार केला. धर्मराज कश्यप मूळचा उत्तर प्रदेशचा आहे. मात्र तो काही दिवस पुण्यात स्क्रॅप गोळा करण्याचे काम करत होता. तसेच बाबा सिद्दिकी यांच्यावर हल्ला करणाऱ्यांना पुण्यातून पिस्तूल मिळाल्याचेही समोर आले आहे. पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Rave Party : खडसेंच्या जावयाला रेव्ह पार्टीत अटक, कट्टर विरोधक गिरिश महाजनांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...

Maharashtra Live News Update: यवतमाळमध्ये आमदार सोनवणे विरोधात आदिवासी संघटना आक्रमक

महिलांचा रस्त्यावर राडा! शेजारच्या वादातून सुरू झाली हाणामारी;VIDEO

Hyundai Kia SUV: ग्राहकांसाठी खुशखबर! ह्युंदाई आणि किआ लाँच करणार 3 नव्या कॉम्पॅक्ट मॉडेल्स

Pune Rave Party: भाजप म्हणजेच 'रेव्ह पार्टी', रोहिणी खडसेंच्या नवऱ्याला अटकेनंतर संजय राऊत संतापले

SCROLL FOR NEXT