Baba Siddique : सलमान खानला मदत करणाऱ्यांना हिशोब द्यावा लागेल, बिश्नोई गँगची उघड धमकी

Salman Khan, Lawrence Bishnoi News : बाबा सिद्दीकी यांच्या हल्ल्याची जबाबदारी घेत, सलमानला मदत करणाऱ्यांना हिशोब द्यावा लागेल, अशा इशारा दिला.
Salman Khan
Salman Khan Saam Tv
Published On

Baba Siddique Death News : सलमान खानची मदत करणाऱ्याला हिशोब द्यावा लागेल, अशी उघड धमकी बिश्नोई गँगलने दिली आहे. शनिवारी रात्री बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली. तीन ते चार जणांनी गोळ्या झाडत सिद्दीकी यांची हत्या केली. सिद्दीकी यांच्या हत्येनंतर देशभरात खळबळ उडाली. माजी मंत्री आणि वाय दर्जाची सुरक्षा असणाऱ्याना सत्ताधारी नेत्याची हत्या झाल्यामुळे गृहमंत्रालयावर टीका केली जातेय. आता बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारत इशारा दिलाय. सलमान खानला मदत करणाऱ्यांना हिशोब द्यावा लागेल, असा थेट इशाराच दिलाय.

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी स्वीकारणारी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. लॉरेन्स बिश्नोई गँगने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. अनुज थापनच्या मृत्यूचा बदला म्हणून हत्या केल्याचा पोस्टमध्ये दावा करण्यात आला आहे. अनुप थापनला सलमान खानच्या घरावर गोळीबार केल्याप्रकरणी अटक झाली होती. मात्र पोलीस कोठडीत अनुप थापनचा मृत्यू झाला होता. पोस्टमध्ये लॉरेन्स बिश्नोई आणि अनमोल बिश्नोईला टॅग करण्यात आलेय.

Salman Khan
मोठी बातमी! लॉरेन्स बिश्नोई गँगने घेतली बाबा सिद्धीकींच्या हत्येची जबाबदारी; मारण्याचं कारणही सांगितलं

सोशल मीडियावरील त्या पोस्टमध्ये दाऊद इब्राहिम याचाही उल्लेख आहे. दाऊदला मदत करणाऱ्यांनाही हिशोब चुकता करावा लागेल, असा इशारा दिलाय. सोशल मीडियावरील या पोस्टची पोलीस चौकशी करत आहेत.

पोस्टमध्ये नेमकं काय म्हटलेय ?

सलमान खान, आम्हाला हे नको होते पण तू आमच्या भावाचे नुकसान केले. आज जे बाबा सिद्दीकी यांचं कौतुक केले जातेय, पण एक वेळ तो दाऊदसोबत मकोका कायद्याखाली होता. त्याला मारण्याचे कारण म्हणजे अनुज थापन होय. दाऊदला बॉलिवूड, राजकारण, प्रॉपर्टी डीलिंगशी जोडणे आहे. आमचे कोणाशीही शत्रूत्व नाही, पण जो कोणी सलमान खान आणि दाऊद गँगला मदत करेल, त्यांचा हिशोब होईल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com