NCP Leade Amol Mitakri Google
महाराष्ट्र

Amol Mitakri: राहुल सोलापूरकरांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा, अमोल मिटकरींची राज्यपालांकडे मागणी

Amol Mitakri On Rahul Solpaurkar: अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. या वक्तव्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी यांनी त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केलाय.

Priya More

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे मराठमोळे अभिनेते राहुल सोलापूरकर अडचणीत आले आहेत. राहुल सोलापूरकरांच्या वक्तव्याचा राजकीय पक्षांकडून निषेध केला जात आहे. राहुल सोलापूरकर यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते अमोल मिटकरी पुन्हा आक्रमक झाले आहेत. अभिनेता राहुल सोलापूरकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अमोल मिटकरी यांनी राज्यपालांकडे केली आहे.

अमोल मिटकरी यांनी सांगितले की, ' राहुल सोलापूरकरांनी रात्री ९ नंतर नशा करूनच दिलगिरी व्यक्त केली. सोलापूरकरांनी जरी दिलगिरी व्यक्ती केली अतली तरी राज्यपालांनी कठोर कायदा आणावा, जेणेकरून भविष्यात अशा घटना होणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांवर वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी मी राज्यपालांकडं केली आहे. त्यासंदर्भात मी राज्यापालांना पत्रही पाठवले आहे.'

'सोलापुरकरांनी माफी मागितली असली तरी त्यांना माफ करू नये. यानंतर असा प्रकार करण्याची हिंमत होऊ नये म्हणून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी.', अशी मागणी अमोल मिटकरींची राज्यपालांकडे केली आहे. तसंच, अमोल मिटकरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर देखील यांसंदरभात पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, 'राहुल सोलापुरकरांनी थातुरमातुर दिलगिरी व्यक्त केली असली तरी हिरकणीबद्दल केलेलं वक्तव्य, मोईन खान, पेटारे नसल्याची बतावणी, आग्रा सुटकेत हुंडा वठवल्याचे पुरावे अद्याप सादर केले नाहीत. त्याने दिलगिरी सुद्धा नशा करुन मागितली आहे. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.'

दरम्यान, मराठी अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी 'मुक्काम पोस्ट मनोरंजन' या युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली होती. या मुलाखतीमध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य केले. राहुल सोलापूरकर यांनी सांगितले की, 'पेटारे-बिटारे असं काहीच नव्हतं. छत्रपती शिवाजी महाराज चक्क लाच देऊन आग्र्यातून सुटून आले होते. आग्र्यातून सुटका करण्यासाठी त्यांनी किती हुंडी वटवला याचे पुरावे देखील आपल्याकडे आहेत. शिवाजी महाराजांनी अगदी औरंगजेबाचा वजीर आणि त्याच्या बायकोला देखील लाच दिली होती. मोहसीन खान की मोईन खान नावाच्या सरदाराकडून सही-शिक्क्याचं अधिकृत पत्र महाराजांनी घेतले होते. त्याच्याकडून घेतलेला परवाना दाखवून शिवाजी महाराज आग्र्यातून बाहेर पडले.' राहुल सोलापूरकरांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर सध्या टीकेची झोड सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate: सोनं १२,४८९ रुपयांनी स्वस्त, तर चांदीचे दर ₹४०,०००नी घसरले; इराण-इस्त्रायल युद्धाचा परिणाम

Shocking : हृदयद्रावक! १० महिन्यांच्या चिमुकलीचा उकळत्या दुधात पडून मृत्यू

काँग्रेसच्या खासदाराचा तडकाफडकी राजीनामा! राजकीय वर्तुळात खळबळ

Maharashtra Live News Update : दिव्यांग शेतकऱ्यांच्या कांद्याला अवकाळी पावसाचा फटका

Sugarcane juice: उस आणि मशिन न वापरता घरच्या घरी तयार करा उसाचा रस

SCROLL FOR NEXT