Amol Mitkari Saam TV
महाराष्ट्र

Amol Mitkari NCP: 'जय श्रीरामचा हट्ट कशाला.. 'अमोल मिटकरींच्या वक्तव्याने नवा वाद ?

जय श्रीरामच्या नावाची दहशत माजविण्याचे काम या सरकारमधील लोक करत असल्याचा "आरोप अमोल मिटकरींनी केला आहे.

Gangappa Pujari

Amol Mitkari : कालचा भारत चांगला होता आजचा भारत दुषित केल्याची खंत व्यक्त करत देशात रंग,जातीवरुन राजकारण केलं जातं मात्र यापलीकडेही देश आहे याचा विचार व्हायला हवा असं म्हणत अमोल मिटकरींनी केंद्र आणि राज्य सरकार निशाणा साधाला आहे.

राजगुरुनगर येथील साहेबराव बुट्टेपाटील स्मुर्ती व्याख्यानमालेच्या कार्यक्रमात बोलताना अमोल मिटकरींनी जय श्रीराम म्हणल्यावर धडकी भरते असे विधान केले आहे. त्यांच्या या विधानावरुन नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. (Amol Mitkari)

याबाबत अधिक माहिती अशी की, राजगुरुनगर येथे साहेबराव बुट्टेपाटील स्मुर्ती व्याख्यानमाला आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमात "उज्ज्वल भारताचे कालचे आजचे आणि उद्याचे स्वप्न' या विषयावर मिटकरींनी व्याखान दिले. ज्यामध्ये त्यांनी हे विधान केले आहे.

काय म्हणाले अमोल मिटकरी...

यावेळी बोलताना त्यांनी "आंदोलनावेळी जय श्रीराम म्हटलं जातं मग रामाने दहशत शिकवली आहे का..? रामाने सावत्र भाऊ असलेल्या भरताला नंदीग्रामची गादी दिली मग ज्याचं जय श्रीराम वर प्रेम असेल त्यांनी स्वतच्या सख्य्या भावाला दोन एकर शेती तरी द्यावी," असे वक्तव्य केले आहे.

त्याचबरोबर पुढे बोलताना त्यांनी "रामाने भावाचा आदर केला, मग जय श्रीराम करणा-यांनी याचा विचार करायला हवा. जसे वंदे मातरमच्या नावाची दहशत तशीच जय श्रीरामच्या नावाची दहशत माजविण्याचे काम या सरकारमधील लोक करत असल्याचा "आरोप करत जय श्रीराम म्हणा-यांना खडेबोल सुनावले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावरुन आता नवा वाद सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

वंदे मातरम वरुन उडवली खिल्ली...

वंदे मातरम् बोलण्यावरुन अमोल मिटकरींनी मुनगंटीवारांची भर कार्यक्रमात नक्कल करत "वंदे मातरम् म्हणण्याचा अट्टाहास कशासाठी केला जातोय असा मुद्दा उपस्थित केला आहे, तसेच सुधीर मुनगंटीवार (BJP) आणि किरिट सोमय्या यांनी वंदे मातरम् हे शब्द स्पष्ट बोलुन दाखवावे त्यांना हसन मुश्रीफ हाच शब्द म्हणता येत नाही वंदे मातरम् काय बोलणार," अशा शब्दात त्यांनी खिल्ली उडवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची तब्येत खालवली; तातडीनं रुग्णालयात दाखल

विधानपरिषद निवडणुकीत शिंदेसेना-भाजप आमनेसामने; महायुतीतला वाद चव्हाट्यावर

रामलीला मैदानावर रावणासोबत झुरळही जाळणार; स्वच्छ भारत अभियानाचा दावा की राजकीय निशाणा?

CJPच्या आंदोलनाआधीच दिपके पोलिसांच्या ताब्यात; दिल्लीत पुन्हा एकदा हायव्होल्टेज ड्रामा

तिकीट तपासणीवरून महिला प्रवासीचा टीसीसोबत वाद; कांदिवली स्टेशनवर नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT