Ajit Pawar
Ajit Pawar  saam tv
महाराष्ट्र

Maharashtra Political Crisis: ...तोपर्यंत सरकारला धोका नाही; अजित पवार स्पष्टच बोलले

Shivani Tichkule

Ajit Pawar Big Statement: राज्याच्या राजकारणाच्या दृष्टीकोणातून आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालय काही तासातच निकाल देणार आहे. त्यामुळे 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल आजच लागणार असल्याने राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. हा निकाल महाराष्ट्राच्या राजकारणाची दिशा बदलवणारा ठरणार आहे. मात्र, निकालाआधीच अजित पवार यांनी एक मोठं विधान केलं आहे. (Breaking Marathi News)

जोपर्यंत १४५ आमदारांचं पाठबळ त्यांच्याकडे आहे. तोपर्यंत सरकारला धोका आहे असं म्हणता येणार नाही असे मोठं विधान विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलं आहे. मे महिन्यात सत्तासंघर्षाचा निकाल लागणार अशी चर्चा होती. आज त्यासंदर्भआत निकाल लागणार आहे. निकाल काहीही लागला तर माझे स्वतःचे मत आहे. सुप्रीम कोर्ट (Supreme Court) सर्वोच्च आहे असे अजित पवार म्हणाले.

माझे याबाबत काही अभ्यासकांशी बोलणं झालं आहे. आजच्या घडीला १४५ पेक्षा जास्त बहुमत त्यांच्याकडे आहे. त्यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. लोकशाहीमध्ये असलेल्या अधिकाराचा ते वापर करत आहेत. जोपर्यंत १४५ चा आकडा त्यांच्याकडे आहे तोपर्यंत सरकारला धोका आहे असं म्हणता येणार नसल्याचे अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले.

पुण्यात झळकले अजित पवारांचे बॅनर्स

पुण्यातील वारजे परिसरात अजित पवार भावी मुख्यमंत्री असे बॅनर्स लागले आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाआधी पुण्यात अजित पवारांचे बॅनर्स लागल्याने चर्चांना उधाण आलं आहे. या फ्लेक्सवर अजित पवार यांच्या विविध भावमुद्रा असलेली छायाचित्रे आहेत. तसेच त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक चिन्ह घड्याळ आणि विकासाची गगनभरारी, हीच अजितदादांची कामगिरी असा आशय यावर लिहलेला आहे. (Political News)

वारजे परिसरात २००२ पासून महापालिकेवर सतत चार पंचवार्षिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक निवडून जात आहे. वारजे परिसरात शेकडो कोटी रुपयांची विकास कामे झाली आहेत. तसेच पुणे शहरातून कोल्हापूर मुंबईकडे जाण्यासाठी या चौकातून जावे लागते. त्यामुळे हा फ्लेक्स लावल्यानंतर याचे फोटो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: पुण्यातील गुलटेकडी परिसरात वाहनांची तोडफोड

Devendra Fadnavis: भाजपने पूनम महाजन यांचे तिकीट का कापले? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं कारण

Maharashtra Politics 2024 : 'त्यांच्या ४८ नाही तर ४९ जागा येतील'; उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर फडणवीसांचा खोचक टोला

Budh Gochar 2024: मे महिन्यात बुध ग्रहाचं परत एकदा परिवर्तन; ५ राशींच्या जीवनात होणार मोठी घडामोड

Pune CCTV: मास्क लावून आले, धाक दाखवला, सोन्याचं दुकान लुटलं! ते 7 दरोडेखोर नेमके कोण?

SCROLL FOR NEXT